शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

माझे सहकारी उत्तम काम करताहेत, गृहमंत्र्यांवर नाराज असल्याची बातमी चुकीची : उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 15:52 IST

Uddhav Thackeray : अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते उत्तम काम करीत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पेनड्राईव्ह बॉम्बनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी सभागृहात त्यांना परखडपणे उत्तर दिले नाही, यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गृहखात्याच्या कारभारावर नाराज आहेत, अशा बातम्या काही प्रसार माध्यमांमध्ये येत आहेत. मात्र, या बातम्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे. 

अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते उत्तम काम करीत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे, या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे-पाटील  यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर अजिबात नाराज नाहीत. प्रत्येकाची आपापली स्टाईल, शैली असते. उलट विधानसभेतील माझ्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांनी फोन करून माझे अभिनंदन केल्याचे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी गृहखात्याच्या हाताळणीवरून नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पेनड्राईव्ह बॉम्बनंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहात खमकेपणाने प्रत्युत्तर द्यायला पाहिजे होते. परंतु, दिलीप वळसे-पाटील यांनी बॅकफूटवर जाऊन सावध पवित्रा घेतला. फडणवीस यांच्या पेनड्राईव्ह बॉम्बनंतर दिलीप वळसे पाटील यांनी आक्रमक आणि सडेतोड भाषण करण्याची गरज होती, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांदेखत नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने प्रसार माध्यमांमध्ये येत होत्या. मात्र, आता या बातम्यांचे स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील