शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेत मविआला बहुमत मिळणार, हा पक्ष मोठा भाऊ ठरणार, काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेत दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 12:47 IST

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीपूर्वी जनमताचा कल जाणून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून वेगवेगळे सर्व्हेही केले जात आहेत. अशाच काँग्रेसने केलेल्या एका सर्व्हेमधून राज्यात सत्तापरिवर्तन होऊन महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असा दावा करण्यात आला आहे.  

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. तसेच राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष, सत्ताधारी महायुती आणि मुख्य विरोधक असलेल्या महाविकास आघाडीकडून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीही सुरू झाली आहे. तसेच या पक्षांकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी जनमताचा कल जाणून घेण्यासाठी वेगवेगळे सर्व्हेही केले जात आहेत. अशाच काँग्रेसने केलेल्या एका सर्व्हेमधून राज्यात सत्तापरिवर्तन होऊन महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असा दावा करण्यात आला आहे.  

काँग्रेसने केलेल्या या अंतर्गत सर्व्हेमधील आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत  महाविकास आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरणार असून, काँग्रेसला ८० ते ८५ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ५५  ते ६० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला ३० ते ३५ जागा मिळतील, असेही या सर्व्हेमध्ये म्हटले आहे. या सर्व्हेतील आकडेवारीवर नजर टाकल्यास महाविकास आघाडीला १६५ ते १८० जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तर राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीला मोठा फटका बसेल, अशी शक्यता या सर्व्हेमधून वर्तवण्यात आली आहे. या सर्व्हेतील आकडेवारीनुसार महायुतीमध्ये भाजपाला ६० ते ६२ जागा, शिवसेना शिंदे गटाला ३० ते ३२ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ८ ते ९ जागा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. या आकडेवारीची बेरीज केल्यास महायुतीला विधानसभा निवडणुकीच एकत्रितरीत्या ९८ ते १०३ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला मोठा धक्का दिला होता. महाविकास आघाडीने राज्यातील ४८ पैकी ३० जागांवर विजय मिळवला होता. तर महायुतीला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले होते.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसMahayutiमहायुतीBJPभाजपा