मुस्लिमांना फ्लॅट नाकारला, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2016 03:05 IST2016-09-19T03:05:22+5:302016-09-19T03:05:22+5:30

साईनगर येथील हॅप्पी जीवन सोसायटीच्या अकरा पदाधिकाऱ्यांविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Muslims rejected the flat, filed a complaint | मुस्लिमांना फ्लॅट नाकारला, गुन्हा दाखल

मुस्लिमांना फ्लॅट नाकारला, गुन्हा दाखल


वसई : सभा घेऊन लेखी ठराव संमत करून एका मुस्लीम कुटुंबाला सोसायटीतील फ्लॅट विक्री करण्यास नाकारणाऱ्या नवघर-माणिकपूर शहरातील साईनगर येथील हॅप्पी जीवन सोसायटीच्या अकरा पदाधिकाऱ्यांविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला .
कांताबेन पटेल (५५) यांनी आपला फ्लॅट विकार खान (३२) यांना विकला होता. कर्ज काढण्यासाठी खान यांना ना हरकत परवाना आवश्यक असल्याने पटेल यांनी सोसायटीकडे तशी मागणी केली होती. मात्र, सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सभा बोलावून त्यात मुस्लीम कुटुंबाला घर विकण्यास विरोध करणारा ठराव संमत करून तसे पत्र पटेल यांना दिले होते.त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असता तक्रार दाखल करून सोसायटीचे सरचिटणीस जितेंद्र जैन यांच्यासह अकरा पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Muslims rejected the flat, filed a complaint