राज्यातील मुस्लीम समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. मुस्लीम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के एसबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील जुने शासन निर्णय आणि परिपत्रके तातडीने रद्द करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
अल्पसंख्याक विकास विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाने १२ वर्षांपूर्वी मुस्लिम समाजातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास गटांसाठी हे आरक्षण जाहीर केले. मात्र, उच्च न्यायालयाने या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर कायदेशीर पेच निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर सरकारने आता हे आरक्षण पूर्णतः रद्द करण्याचा आणि त्यासंबंधीचे अध्यादेश मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अध्यादेशातील महत्त्वाचे मुद्दे:
आरक्षणाचे स्वरूप: शासकीय व निमशासकीय सरळसेवा भरती आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी मुस्लीम समाजाला 'विशेष मागास प्रवर्ग-अ' अंतर्गत ५ टक्के आरक्षण देण्यात आले होते.
कागदपत्रे अवैध: या आरक्षणानुसार आतापर्यंत दिले जाणारे जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली असून, यापूर्वीचे संबंधित शासन निर्णय रद्द करण्यात आले आहेत.
प्रशासकीय बदल: सामान्य प्रशासन विभाग आणि अल्पसंख्याक विकास विभागाने यापूर्वी निर्गमित केलेले वाचा क्र. १ ते ५ मधील सर्व शासन निर्णय आणि परिपत्रके आता अकार्यान्वित ठरवण्यात आली आहेत.
तब्बल १२ वर्षांपूर्वी जाहीर झालेले हे आरक्षण रद्द झाल्यामुळे मुस्लीम समाजातील शैक्षणिक आणि नोकरीच्या संधींवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेषतः ज्या विद्यार्थ्यांनी या आरक्षणांतर्गत लाभ मिळवला किंवा जे दाखल्यांच्या प्रतीक्षेत होते, त्यांच्यासाठी हा निर्णय आव्हानात्मक ठरू शकतो.
Web Summary : Maharashtra government cancels the 5% reservation for Muslim community under Special Backward Class category. The decision revokes previous government resolutions after High Court stay. This impacts educational and job opportunities, especially for students awaiting benefits.
Web Summary : महाराष्ट्र सरकार ने मुस्लिम समुदाय के लिए विशेष पिछड़ा वर्ग के तहत 5% आरक्षण रद्द कर दिया। उच्च न्यायालय के स्थगन के बाद सरकार ने पहले के आदेश रद्द किए। इससे शिक्षा और नौकरी के अवसरों पर असर पड़ेगा, खासकर उन छात्रों पर जो लाभ की प्रतीक्षा कर रहे थे।