'भारत माता की जय' घोषणा देत ओवैसीच्या विरोधात मुस्लिमांचा मोर्चा

By Admin | Updated: March 18, 2016 17:47 IST2016-03-18T17:35:52+5:302016-03-18T17:47:39+5:30

ओवैसी यांच्या निषेधार्थ साता-यातील मुस्लिम तरुणांनी मोर्चा काढला. यावेळी 'भारत माता की जय' अन 'जय हिंद'च्या जोरदार घोषणाही देण्यात आल्या.

Muslim Front's campaign against Owaisi, declaring 'Bharat Mata Ki Jai' | 'भारत माता की जय' घोषणा देत ओवैसीच्या विरोधात मुस्लिमांचा मोर्चा

'भारत माता की जय' घोषणा देत ओवैसीच्या विरोधात मुस्लिमांचा मोर्चा

 ऑनलाइन लोकमत

सातारा, दि. १८ -  वादग्रस्त विधाने केल्याबद्दल 'एमआयएम'चे नेते ओवैसी यांच्या निषेधार्थ साताऱ्यातील मुस्लिम तरुणांनी मोर्चा काढला. यावेळी 'भारत माता की जय' अन 'जय हिंद'च्या जोरदार घोषणाही देण्यात आल्या. 
 
लातूर येथील सभेत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी 'भारत माता की जय बोलणार नाही', असं वक्तव्य केलं होतं त्याचे पडसाद राज्यात पडत असल्याचे दिसते आहे. ओवेसी यांच्या ‘भारत माता की जय’ या घोषणेवरील वक्तव्यावरुन आधीच राजकारण पेटले आहे. काल विधानसभेत अधिवेशन संपेपर्यंत एमआयएम आमदार वारिस पठाण यांचं निलंबन करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
 
'रिपाईं'च्या अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्ह्याध्यक्ष फारुख पटनी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात असंख्य तरुण-तरुणी सामील झाले होते. 'मुस्लिमांची दिशाभूल करणाऱ्या ओवैसींच्या वक्तव्यांना भीक न घालता अल्पसंख्यांक समाजाने देशहिताचा विचार करावा,' असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Web Title: Muslim Front's campaign against Owaisi, declaring 'Bharat Mata Ki Jai'