मुरुड येथे सर्वाधिक १५१ मि.मी. पाऊस

By Admin | Updated: June 28, 2016 02:27 IST2016-06-28T02:27:40+5:302016-06-28T02:27:40+5:30

रायगड जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत मुरुड येथे सर्वाधिक १५१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Murud has the highest temperature of 151 mm. Rain | मुरुड येथे सर्वाधिक १५१ मि.मी. पाऊस

मुरुड येथे सर्वाधिक १५१ मि.मी. पाऊस

जयंत धुळप,

अलिबाग- रायगड जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत मुरुड येथे सर्वाधिक १५१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. याच चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण ९७०.६० मि.मी. पाऊस झाला असून, हे सरासरी पर्जन्यमान ५४.४१ मि.मी. आहे. गतवर्षी याच दिवशी हा एकू ण पाऊस ८२.७० मि.मी. होता व त्यावेळी सरासरी पर्जन्यमान ५.१७ मि.मी. होते. दरम्यान, जिल्ह्यातील वार्षिक एकू ण अपेक्षित पावसापैकी १७.०३ टक्के पाऊस पूर्ण झाला आहे.
रायगड जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या सहाही नद्यांच्या खोऱ्यामध्ये अत्यंत दमदार पर्जन्यवृष्टी झाली असल्याने, या नद्यांपैकी उल्हास, पाताळगंगा, सावित्री, कुंडलिका या चार नद्यांची जलपातळी पूररेषेकडे सरकू लागली आहे. रायगड जिल्हा प्रशासनाने संबंधित तहसीलदारांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहे. सोमवारी समुद्रास दुपारी ४.३० वाजता भरती आहे आणि याच काळात नदीखोऱ्यात सातत्यपूर्ण पर्जन्यवृष्टी झाल्यास नदी जलपातळीत अधिक वाढ होण्याची शक्यता रायगड पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत कुंडलिका नदीच्या खोऱ्यात ६७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून डोलवहाळ (कोलाड) येथे नदी जलपातळी २२.३० मीटर झाली आहे.
>नद्यांची पातळी
कुंडलिका नदीची धोकादायक पूर पातळी २३.९५ मीटर आहे. सावित्री नदीच्या खोऱ्यात ३८ मि.मी. पावसाची नोंद झाली.
महाड येथे नदी जलपातळी ४.५० मी आहे. सावित्री नदीची धोकादायक पूर पातळी ६.५० मी आहे. पाताळगंगा खोऱ्यात ३० मि.मी. पावसाची नोंद झाली

Web Title: Murud has the highest temperature of 151 mm. Rain