मुरुडचा परिसर मिरवणुकींनी दणाणला
By Admin | Updated: May 17, 2014 01:09 IST2014-05-17T01:09:35+5:302014-05-17T01:09:35+5:30
रायगड लोकसभा निवडणूक बघता चुरशीची झाली.

मुरुडचा परिसर मिरवणुकींनी दणाणला
नांदगाव : रायगड लोकसभा निवडणूक बघता चुरशीची झाली. शेवटच्या टप्प्यापर्यंत कोणता उमेदवार जिंकेल हे कळत नव्हते, अखेर गीते यांनी २२१0 मतांची आघाडी घेत राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांना पराभूत करुन विजय मिळविला. विजयाची बातमी येताच मुरुड येथील शिवसैनिकांनी ढोल ताशांच्या गजरात मोठी मिरवणूक काढली. हातात भगवे झेंडे घेत संपूर्ण बाजारपेठेत ही मिरवणूक दिमाखदार फिरवण्यात आली. यावेळी नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्या मुग्धा जोशी, अलंकार भोसले, कुणाल सतविडकर, अशिल ठाकूर, विरेन भगत, रुपेश पाटील, सागर चौलकर, स्वप्नील श्रीवर्धनकर, प्रतीक मसाल, गणेश मसाल तसेच महिला व असंख्य युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. (वार्ताहर)