‘त्या’ नराधमास मरेर्पयत फाशी!

By Admin | Updated: October 17, 2014 02:25 IST2014-10-17T02:25:19+5:302014-10-17T02:25:19+5:30

तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून खून करणा:या अनिल जगन्नाथ पवार यास कोपरगाव जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आऱए़ गायकवाड यांनी मरेर्पयत फाशीची शिक्षा ठोठावली़

'That' Murder to Murder Murder! | ‘त्या’ नराधमास मरेर्पयत फाशी!

‘त्या’ नराधमास मरेर्पयत फाशी!

कोपरगाव (अहमदनगर) : राहाता तालुक्यातील डो:हाळे येथे तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून खून करणा:या अनिल जगन्नाथ पवार यास कोपरगाव जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आऱए़ गायकवाड यांनी मरेर्पयत फाशीची शिक्षा ठोठावली़
कोपरगाव न्यायालयाच्या 13क् वर्षाच्या इतिहासात ही पहिलीच फाशीची शिक्षा आहे. 13 ऑगस्ट 2क्11 रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी जयश्री एकनाथ डांगे (13) हिच्यावर पवार याने शेतात बलात्कार करून धारदार शस्त्रने खून केला होता. शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल झाला़ आरोपी पवारला जेरबंद केल्यानंतर त्याने कबुली दिली होती. त्याच्याकडून चाकू, मोटारसायकल जप्त करण्यात आली होती़ त्यानंतर सरकारी वकील अॅड़ विद्यासागर शिंदे यांनी न्यायालयात चौदा साक्षीदार तपासल़े
2क्क्6 साली त्याने महिला वसतिगृहावर डबे पोहोचविणा:या महिलेचा बलात्काराच्या उद्देशाने खून केला़ त्याला अहमदनगर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली़ येरवडा कारागृहात अनिल पवारची रवानगी करण्यात आली़ 2क्क्3 रोजी तो पॅरोलवर सुटला़ दोन महिन्यांत पुन्हा कारागृहात जाणो अपेक्षित होत़े मात्र तो फरार झाला़ चितळी येथे बलात्काराच्या उद्देशाने एका महिलेचा पाठलाग करीत असताना संबंधित महिला विहिरीत पडली़ त्या प्रकरणी त्याच्यावर 3क्7 कलमान्वये गुन्हा दाखल झाला़ त्यात तो निदरेष सुटला़ सोनई पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2क्क्6 मध्ये पवारने अंबिका डुकरे या 18 वर्षीय मुलीचा बलात्कार करून खून केला़ या गुन्ह्यात श्रीरामपूर न्यायालयाने त्यास फाशीची शिक्षा सुनावली़ मात्र औरंगाबाद खंडपीठाने ही शिक्षा जन्मठेपेत परावर्तित केली़

 

Web Title: 'That' Murder to Murder Murder!