बाजार समितीतील हमालाचा धारदार शस्त्राने खून

By Admin | Updated: March 4, 2017 23:53 IST2017-03-04T23:53:01+5:302017-03-04T23:53:01+5:30

उत्तम हिरा हॉटेलजवळील घटना : रात्री अकरा वाजेची घटना: हल्लेखोर फरार

The murder of the market committee by the weapon with sharp weapons | बाजार समितीतील हमालाचा धारदार शस्त्राने खून

बाजार समितीतील हमालाचा धारदार शस्त्राने खून


नाशिक : दिंडोरी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालाचा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना शनिवारी (दि़४) रात्री अकरा वाजेच्या सुमारास मार्केट यार्डाजवळील उत्तम हिरा हॉटेलजवळ घडली़ खून झालेल्या इसमाचे नाव दीपक दगडू अहिरे (२९, रा़ निलगिरी बाग, औरंगाबाद रोड,नाशिक) असे आहे़ दरम्यान, हा खून पूर्ववैमनस्यातून केल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे़
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलगिरी बाग येथील दीपक अहिरे हा कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली व्यवसाय करतो़ रात्री अकरा वाजेच्या सुमारास अहिरे आपल्या काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीने (एम एच १५, सीएच ६३७३) जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या पाठिवर धारदार शस्त्राने वार केले़ यामध्ये अहिरेच्या वर्मी घाव बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला व त्याचा मृत्यू झाला़
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पंचवटीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्ढेकर, पोलीस निरीक्षक सुनील पुजारी आदींसह पोलीस कर्मचारी दाखल झाले होते़ दरम्यान, पुर्ववैमनस्यातून हा खून करण्यात आला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़ (प्रतिनिधी)

 

Web Title: The murder of the market committee by the weapon with sharp weapons