शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले
2
'वंदे भारत स्लीपर'चे तिकीट दर पाहून डोळे विस्फारतील! १३,३०० रुपयांपर्यंत, ४०० किमीसाठी ₹१५२०; किलोमीटरनुसार भाडे बदलणार...
3
मोठी बातमी! राज्यातील 'बिनविरोध' निवडीला स्थगिती मिळणार?; उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी
4
हो… अगदी खरे आहे… ‘वंदे भारत’हून वेगवान, शताब्दीपेक्षा सुपरसेवा; तिकीट फक्त ₹५! कोणती ट्रेन?
5
10 मिनिटांच्या डिलिव्हरीला ब्रेक; झेप्टो, ब्लिंकइट, स्विगीबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
6
Happy Makar Sankranti 2026 Wishes: मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, WhatsApp Status शेअर करत वाढवा सणाचा गोडवा!
7
ट्रम्प यांच्या टॅरिफला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; उद्या निकाल लागण्याची शक्यता; निर्णय विरोधात गेल्यास काय करणार?
8
Municipal Election: भाजपाची मतदानाआधी मोठी कारवाई! माजी महापौरांसह ५४ जणांची पक्षातून हकालपट्टी
9
महापालिका निवडणुकीत शिंदेसेना, उद्धवसेनेला दोन अंकी आकडा गाठतील का?
10
लॅपटॉपचा कीबोर्ड अचानक बंद झालाय? सर्व्हिस सेंटरला धावण्यापूर्वी करा 'हे' ५ सोपे उपाय; वाचतील हजारो रुपये!
11
भरधाव ट्रेनमधून १४० मीटरपर्यंत उडाल्या ठिणग्या, भीतीचं वातावरण, मोठा अपघात टळला
12
सीमेपलीकडे 8 दहशतवादी छावण्या सक्रिय; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची मोठी माहिती
13
Ambernath: अंबरनाथमध्ये महायुतीत तुफान राडा; नगरपालिकेबाहेर भाजप-शिंदेसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले!
14
भारीच! गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडने खरेदी केलेला 'लव्ह इन्शुरन्स'; १० वर्षांनी केलं लग्न अन् झाले मालामाल
15
भयंकर फसवणूक! दोन मुलांच्या बापाने गुपचूप बदललं लिंग; २ वर्षांनंतर पत्नीला कळलं, कोर्टात म्हणाली..."
16
Winter Recipe: हाय-प्रोटिन 'बाजरी मुंगलेट': थंडीत वजन कमी करण्यासाठी आणि नाश्त्यासाठी सर्वोत्तम पौष्टिक रेसिपी!
17
तुमचे 'मनी मॅनेजमेंट' किती स्ट्रॉन्ग आहे? सरकारी क्विझ खेळा आणि रोख १०,००० रुपये मिळवा
18
“राज ठाकरे जे बोलले, त्यासाठी हिंमत लागते, गौतम अदानी...”; संजय राऊतांची भाजपावर टीका
19
चिप्सच्या पाकिटाचा भीषण स्फोट; ८ वर्षांच्या मुलाने गमावला डोळा, घरात नेमकं काय घडलं?
20
Virat Kohli च्या RCB साठी आली महत्त्वाची बातमी ! IPL 2026 आधी मोठा बदल, चाहते होणार नाराज?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! राज्यातील 'बिनविरोध' निवडीला स्थगिती मिळणार?; उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 14:01 IST

अविनाश जाधव यांनी ज्याठिकाणी बिनविरोध उमेदवार आहेत तिथल्या निवडणुकांना स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे

मुंबई - राज्यात २९ महापालिका निवडणुका सुरू आहेत. त्यात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. मात्र या निवडणुकांच्या मतदानापूर्वी राज्यात ६० हून अधिक ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवडून आलेत. विशेष म्हणजे हे उमेदवार सत्ताधारी महायुतीचे आहेत. त्यात सर्वाधिक बिनविरोध भाजपाचे आणि त्याखालोखाल एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे आहेत. निवडणुकीतील या बिनविरोध पॅटर्नविरोधात मनसे नेते अविनाश जाधव यांनी कोर्टात धाव घेतली होती. उमेदवारांना पैशाची आमिषे, दहशत याचा वापर करून सत्ताधाऱ्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला असा मनसेचा आरोप आहे. 

अविनाश जाधव यांनी ज्याठिकाणी बिनविरोध उमेदवार आहेत तिथल्या निवडणुकांना स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी याचिका हायकोर्टात दाखल केली होती. त्यावर उद्या १४ जानेवारीला तातडीची सुनावणी होणार आहे. आज प्रचाराचा शेवट दिवस आहे आणि बिनविरोध निवडीवर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. या याचिकेच्या माध्यमातून ज्याठिकाणी बिनविरोध निवडी झाल्यात तिथे स्थगिती देण्यात यावी आणि जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत ही स्थगिती कायम ठेवावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर उद्या या याचिकेवर सुनावणी होईल. 

राज्यात याआधी इतक्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवडणुका कधीच झाल्या नाहीत. स्थानिक पातळीवर जिथे बिनविरोध निवडणुका झाल्यात तिथे अनेक चर्चा होत आहेत. ३ ते ६ कोटी रुपयांची आमिषं दाखवून विरोधी उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावले. ही लोकशाहीची भयानकता आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या वतीने आम्ही कोर्टात याचिका केली. त्यात ३ मुख्य मुद्दे आहेत. राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवडणुका झाल्या नाहीत. ६८ ते ७० ठिकाणी भाजपा, शिंदेसेना आणि अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार बहुमताने निवडून आलेत. याबद्दल लोकांमध्ये शंका आहे. प्रथमदर्शनी ही चोरीची घटना म्हणून निदर्शनास येते. दुसरे नोटाचे जे मतदार आहेत त्यांना एक उमेदवार असला तरी मतदान करू दिले पाहिजे. किमान मतदान टक्का हा बिनविरोध निवडणुकांसाठी काय असेल याबद्दल कायद्यात तरतूद नसेल तर राज्य  सरकारने कायद्यात सुधारणा करावी अशी मागणी याचिकेत केल्याचे वकील असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या कामकाजाबद्दल अनेक शंका आहे. लोकांमध्येही निवडणूक आयोगाच्या कारभारावर नाराजी आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या बिनविरोध निवडींची चौकशी व्हावी अशी मागणी याचिकेत आहे. राज्य निवडणूक आयोगाला या बिनविरोध निवडीसाठी चौकशी समिती नेमावी लागली आहे. या याचिकेत राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. त्यामुळे हायकोर्टात बिनविरोध निवडीवर काय सुनावणी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra's unopposed election victories face High Court scrutiny tomorrow.

Web Summary : Maharashtra's unopposed election wins, mostly for ruling alliance, challenged in court. MNS alleges coercion. Hearing tomorrow may halt elections where unopposed wins occurred.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२६MNSमनसेAvinash Jadhavअविनाश जाधवHigh Courtउच्च न्यायालयThane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६