शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू

By यदू जोशी | Updated: September 27, 2025 09:18 IST

क्रम बदलला जाणार का? राजकीय वर्तुळात उत्सुकता, विशेषत: मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पिकांना मोठा फटका बसला असून, बळीराजा हवालदिल झाला आहे

यदु जोशीमुंबई : जिल्हा परिषद निवडणूक ही आधी आणि नंतर नगरपालिका व शेवटी महापालिका निवडणूक घेतली जाईल, असे चित्र असताना महापूर, अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक घेण्यात अडचण आली तर आधी नगरपालिकांची निवडणूक घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने ठेवली आहे. त्यामुळे अपेक्षित क्रम बदलला जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. 

जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने मतदार याद्यांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या मतदार याद्यांवर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविणे आणि त्यावर निर्णय देऊन २७ ऑक्टोबरला अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यात येणार आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समित्यांच्या गणांचे आरक्षण जाहीर करून नोव्हेंबरच्या मध्यात प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणूक होईल, असे  मानले जात होते. 

मात्र, राज्यातील जवळपास २०हून अधिक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे गंभीर परिस्थिती आहे. प्रचंड नुकसान झाले आहे.  विशेषत: मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पिकांना मोठा फटका बसला असून, बळीराजा हवालदिल झाला आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे.  अशा परिस्थितीत निवडणूक आधी घेणे संयुक्तिक ठरेल का, याचा विचार आता सुरू झाला आहे. दरम्यान,  खात्रीलायक सूत्रांनी सांगितले की, वेळ आलीच तर नगरपालिकांच्या निवडणुका आधी घेता यावी दृष्टीने निवडणूक आयोगाने तयारी ठेवली आहे. 

निवडणुकांची स्थिती नाहीनिवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहे. आयोग राजकीय पक्ष तसेच जिल्हाधिकाऱ्यांचे याबाबतचे मत व राज्यातील नेमकी परिस्थिती बघून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा क्रम निश्चित करेल असे मानले जात आहे. ३१ जानेवारी २०२६ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका घ्याव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. अतिवृष्टी, महापुराचा फटका बसलेल्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक आधी घेण्यासारखी स्थिती नाही असे प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यात सत्तारूढ व विरोधी पक्षांचे नेतेदेखील आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Zilla Parishad or Municipal Council First? Election Commission Prepares for Both

Web Summary : Due to floods, municipal elections might precede Zilla Parishad polls. The Election Commission is prepared for either scenario, considering weather conditions and political consensus before finalizing the election schedule. Final voter lists for Zilla Parishad elections will be out October 27th.
टॅग्स :Electionनिवडणूक 2024floodपूरMaharashtraमहाराष्ट्र