Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 18:22 IST2025-11-04T18:21:19+5:302025-11-04T18:22:48+5:30
Maharashtra Municipal Corporation Election 2025: राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी महापालिकांच्या निवडणुकीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर
Municipal Corporation Election Maharashtra: सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांना घोषणेची प्रतिक्षा होती, ती अखेर झाली. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. पण, महापालिकांच्या निवडणुका कधी, असा प्रश्न उपस्थित झाला. याबद्दल राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना विचारण्यात आला. त्यांनी यावर आयोगाची भूमिका स्पष्ट केली.
राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीतून ६ हजार ८४९ सदस्य आणि २८८ अध्यक्ष निवडले जाणार आहेत. यासाठीचा सविस्तर कार्यक्रम घोषित करण्यात आला. निवडणूक आयोगाने ही घोषणा केल्यानंतर महापालिकांची निवडणुकीबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार?
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होतील आणि ३१ जानेवारीच्या आधी निवडणुका घेऊ शकाल याबद्दल खात्री आहे का?
या प्रश्नाला उत्तर देताना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले, "३१ जानेवारीच्या पूर्वी आम्हाला सगळ्या निवडणुका घ्यायच्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे तसे आदेश आहेत. कोणत्याही परिस्थिती निवडणुका घ्या, असे आदेश आहेत."
पहिल्या टप्प्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायती, असा आहे निवडणूक कार्यक्रम
अर्ज दाखल करण्याची तारीख – १० नोव्हेंबर २०२५
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख – १७ नोव्हेंबर २०२५
अर्जांची छाननी – १८ नोव्हेंबर २०२५
अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख – २१ नोव्हेंबर २०२५
आक्षेप असलेल्या ठिकाणी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख – २५ नोव्हेंबर २०२५
निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होण्याची तारीख – २६ नोव्हेंबर २०२५
मतदानाची तारीख – २ डिसेंबर २०२५
मतमोजणीची तारीख – ३ डिसेंबर २०२५
किती मतदार आणि मतदान केंद्र असणार?
पुरुष मतदार - ५३,७९,९३१
महिला मतदार - ५३,२२,८७०
इतर मतदार - ७७५
एकूण मतदार - १,०७,०३,५७६
एकूण मतदान केंद्र - १३,३५५