शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नायजेरियात २२ भारतीय खलाशांना बेड्या; मालवाहू जहाजावर कोकेन सापडले...
2
धक्कादायक! अमेरिकेत भारतीय तरुणीचा खून करून प्रियकर भारतात पसार; पोलिसांना भेटून आला...
3
वंदे भारत एक्सप्रेस रुळावरून घसरण्याचा कट! रुळांवर लाकूड ठेवल्याचे आढळले; मोठा अपघात टळला
4
बँक कर्मचारी संपावर जाणार, तीन दिवस व्यवहार होणार ठप्प; कधी, कुठे अन् कसा परिणाम होईल?
5
धक्कादायक! ट्रंप यांची व्हेनेझुएलावर दुसऱ्या हल्ल्याची धमकी; आता कोलंबियाही रडारवर, दक्षिण अमेरिकेत युद्धाचे ढग?
6
भाजपविरोधात १०१, तर शिंदेसेनेच्या विरोधात ८३ ठिकाणी मनसे लढणार; मराठी मते कोणाला मिळणार?
7
आजचे राशीभविष्य ५ जानेवारी २०२६ :आज ग्रहांची चाल 'या' राशींसाठी ठरणार फलदायी; पाहा तुमचे राशीभविष्य!
8
‘बिनविरोध’ निवडीवरून राज्यात राजकीय रणकंदन; मुख्यमंत्री फडणवीस यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर
9
मुंबईत १० रुपयांत जेवण, ठाकरेंचा शब्द; महापालिका निवडणुकीसाठी वचननामा
10
“हिंदू आहोत, हिंदी नाही, इथल्या प्रत्येक शहरातील महापौर मराठीच होणार”: राज ठाकरे
11
“विधानसभा अध्यक्षांना निलंबित करावे”; पदाचा दुरुपयोग केल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप
12
“वचननामा नव्हे ‘वाचून’नामा”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे बंधूंवर खोचक टीका
13
“स्वतः विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेत, आधी उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”: आशिष शेलार
14
“उद्धव ठाकरे यांचा महापौर झाल्यास, मुंबईचे पाकिस्तान होईल”; अमित साटम यांनी केला प्रत्यारोप
15
राज्यातील प्रत्येक बसस्थानक-नगरपालिकेत पुस्तकांचे सवलतीत दुकान; DCM शिंदेंची साहित्य संमेलनात घोषणा
16
ठाण्यातून मराठी माणूस हद्दपार होतोय, मौनव्रत का? उद्धवसेनेचे नेते केदार दिघेंचा सवाल
17
बंडखोरी आटोक्यात; मात्र अपक्षांची डोकेदुखी कायम, ठाण्यात १३१ जागांसाठी ८६ अपक्ष रिंगणात
18
प्रचारादरम्यान भिवंडीत काँग्रेस-भाजपात झालेला राडा; दोन गटांतील २३ जणांवर गुन्हा
19
व्हेनेझुएलावर ताबा, राष्ट्राध्यक्षांवर चालणार खटला; देशाची व्यवस्था तात्पुरती अमेरिकेच्या ताब्यात
20
"कधीतरी थांबायला हवं..." भाजपा नेते नारायण राणेंचे निवृत्तीचे संकेत, समर्थकांसमोर झाले भावूक
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात फिरतायत हजारभर स्वीकृत नगरसेवक; तुम्ही म्हणाल ही काय भानगड? बंडखोरी टाळण्याचे गाजर!

By यदू जोशी | Updated: January 4, 2026 06:20 IST

निकाल लागण्याआधीच राज्यात हजारएक स्वीकृत नगरसेवक तयार झाले आहेत.

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क: तुम्ही म्हणाल ही काय भानगड आहे? तर त्याचे असे आहे, की प्रत्येक महापालिकेत १५ नगरसेवकांच्या मागे एका स्वीकृत नगरसेवकाची नियुक्ती करावी, असा नवीन नियम देवेंद्र फडणवीस सरकारने वर्षभरापूर्वी केला आहे. पूर्वी प्रत्येक महापालिकेत पाच स्वीकृत नगरसेवक असायचे, पण या सरकारने तो पॅटर्न बदलला आणि नगरसेवकांच्या संख्येच्या प्रमाणात स्वीकृत नगरसेवक नेमले जातील, असा नवीन शासन निर्णय काढला. 

उदाहरणच द्यायचे तर फडणवीस यांच्या नागपुरात १५१ नगरसेवक आहेत, तिथे आता १० स्वीकृत नगरसेवक नेमता येणार आहेत. राज्यातील २९ महापालिकांमध्ये नगरसेवकांची एकूण संख्या आहे, २८६६. त्यानुसार प्रत्येक १५ नगरसेवकांमागे एक स्वीकृत सदस्य नेमायचे म्हटले तर त्यांची संख्या होईल, १९१. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांत विविध पक्षांकडून आणि विशेषत: भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्याकडून आतापर्यंत हजारएक लोकांना तरी स्वीकृत नगरसेवकपदाचे गाजर दाखविण्यात आले आहे असे म्हणतात. 

एकाच जागेसाठी दोन प्रबळ दावेदार पक्षात असतील तर त्यापैकी एकाला संधी देताना दुसऱ्याला स्वीकृत नगरसेवकपद देऊ, असे सांगून शांत केले गेले. तरीही बंडखोरी केलीच तर उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावताना स्वीकृत नगरसेवकपदाचे गाजर  दाखविले गेले. त्यामुळे निकाल लागण्याआधीच राज्यात हजारएक स्वीकृत नगरसेवक तयार झाले आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Accepted Councilors: Carrot to Prevent Rebellion in Maharashtra Politics?

Web Summary : Maharashtra's government created numerous accepted councilor positions. This aims to appease potential rebels within parties like BJP, Shinde Sena, and NCP by offering them these positions, preventing political upheaval before election results are even announced.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६PoliticsराजकारणMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी