महापालिका ‘अ’ श्रेणीत

By Admin | Updated: September 2, 2014 01:12 IST2014-09-02T01:12:39+5:302014-09-02T01:12:39+5:30

राज्य सरकारने विशेष बाब म्हणून नागपूर शहराचा ‘अ’ श्रेणी महापालिकांत समावेश केला आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दर्जा वाढल्याने आता महापौरांच्या गाडीवर लाल दिवा (विनाफ्लॅश) तर

In municipal 'A' category | महापालिका ‘अ’ श्रेणीत

महापालिका ‘अ’ श्रेणीत

नागपूरचा दर्जा वाढला : विशेष बाब म्हणून ‘समावेश
नागपूर : राज्य सरकारने विशेष बाब म्हणून नागपूर शहराचा ‘अ’ श्रेणी महापालिकांत समावेश केला आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दर्जा वाढल्याने आता महापौरांच्या गाडीवर लाल दिवा (विनाफ्लॅश) तर आयुक्तांच्या गाडीवर के सरी दिवा (फ्लॅशसह) लागणार आहे. नागपूर महापालिकेचा ‘ब’ वर्ग महापालिकांत समावेश होता. दर्जा वाढल्याने शहराची प्रतिष्ठा वाढली आहे. परंतु यामुळे केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात कपात होण्याची शक्यता आहे. आजवर ‘ब’ दर्जामुळे नागपूर महापालिकेला जेएनएनयूआरएम योजनांत ३० टक्के निधी द्यावा लागत होता. ‘अ’ दर्जा झाल्याने केंद्र व राज्य सरकारच्या योजनात मनपाचा वाटा वाढण्याची शक्यता आहे.
शहराचा दर्जा वाढविण्यात आला. परंतु का वाढविला, याचा शासन अध्यादेशात उल्लेख नाही. उपराजधानीचे शहर असल्याने विशेष बाब म्हणून दर्जा वाढविण्यात आल्याची चर्चा आहे. वास्तविक दरडोई उत्पन्नाचा विचार करता, यात नागपूर इतर शहरांच्या तुलनेत मागे आहे. दर्जा वाढल्याचा लाभ केंद्र व राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्यांच्या भत्त्यात वाढ होणार आहे.(प्रतिनिधी)
सुविधा मिळणार
नागपूर शहराला ‘अ’ दर्जा मिळाल्याने शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील. शहर विकासाला चालना मिळेल, असा विश्वास आयुक्त श्याम वर्धने यांनी व्यक्त केला.

Web Title: In municipal 'A' category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.