शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

मुनगंटीवार म्हणाले, 'आम्ही शिवसेनेला फसवलं'; अजितदादा म्हणतात; 'चुकीला माफी नाही'!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 3:16 PM

राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच, असे सांगत मुनगंटीवारांनी काँग्रेस- राष्ट्रवादीला टोला लगावला.

मुंबईः विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे. ज्योतिरादित्य शिंदेंनी भाजपात प्रवेश केल्यावरून मुनगंटीवारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला हाणला, त्याला अजित पवारांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेला आम्ही फसवलंय, पण त्याचा फायदा तुम्ही घेऊ नका. सेना एवढी संमोहित झालीय की, त्यांना काहीच दिसत नाही. तसेच आमच्या चुकीचा तुम्ही एवढा फायदा उचलू नका. राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच, असे सांगत मुनगंटीवारांनी काँग्रेस- राष्ट्रवादीवर निशाणा साधला. तोच धागा पकडत अजितदादांनी मुनगंटीवारांवर पलटवार केला. सुधीर मुनगंटीवार म्हणतात चूक झाली, चूक झाली. पण आता चुकीला माफी नाही, असं अजितदादा म्हणाल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.तसेच 'दगडी चाळ' चित्रपटातील 'चुकीला माफी नाही' हा डायलॉग आज विधानसभेत जोरदार घुमला. विशेष म्हणजे अजित पवारांनी चुकीला माफी नाही, असं म्हटल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही मान हलवून त्याला अनुमोदन दिलं. इकडे ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, पण तिकडे (भाजप) होणार नाही याची काळजी घ्या, असा उपरोधिक सल्लाही अजितदादांनी मुनगंटीवारांना दिला आहे. त्यानंतर लागलीच मुनगंटीवारांनी अजित पवारांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. सुधीर मुनगंटीवार यांनी थेट त्यांच्या पहाटेच्या शपथविधीची आठवण करून दिली. या दुखऱ्या नसेवर बोट ठेवल्यानंतर अजित पवारही आक्रमक झाले. "मी शपथ घेतली मान्य करतो. मी काही लपून करत नाही, तिथे गेलो, ते सोडून इथे आलो आणि आता मी इथे मजबूत बसलोय, असं म्हणत अजित पवारांनीही मुनगंटीवारांनाही खडे बोल सुनावले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार