मुंडेच्या अपघाती मृत्यूचा तपास CBIकडे

By Admin | Updated: June 16, 2014 15:43 IST2014-06-16T13:16:31+5:302014-06-16T15:43:02+5:30

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूचा तपास आता सीबीआय करणार आहे.

Munde's death was investigated by CBI | मुंडेच्या अपघाती मृत्यूचा तपास CBIकडे

मुंडेच्या अपघाती मृत्यूचा तपास CBIकडे

>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १६ - भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूचा तपास आता सीबीआय करणार आहे. ३ जून रोजी दिल्लीत झालेल्या अपघातादरम्यान मुंडे यांचे निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी सर्व स्तरांतून होती. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही सीबीआय तपासाची शिफारस केली होती. अखेर सीबीआयने या प्रकरणाचा तपास करण्यास मान्यता दिली असून सीबीआयचे विशेष पथक या अपघाताची चौकशी करणार आहे. 
 

Web Title: Munde's death was investigated by CBI