मुंडेंच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट?
By Admin | Updated: June 4, 2014 01:35 IST2014-06-04T01:35:23+5:302014-06-04T01:35:23+5:30
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूच्या नेमक्या कारणांबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे.

मुंडेंच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट?
>शवविच्छेदनानंतरही प्रश्नचिन्ह कायम
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूच्या नेमक्या कारणांबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. मुंडे यांचा मृत्यू यकृत फाटल्याने की हृदयविकाराच्या झटक्याने झाला, हे शवविच्छेदनानंतरही नेमकेपणो स्पष्ट झालेले नाही.
मुंडेंना सकाळी 6.3क् वाजेच्या दरम्यान एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये आणण्यात आले, तेव्हा त्यांच्या शरीराची कोणतीही हालचाल नव्हती, असे तेथील डॉक्टर अमित गुप्ता यांनी सांगितले. त्यानंतर कृत्रिम पद्धतीने श्वास चालू करण्यासाठी डॉक्टरांनी 15 मिनिटे शर्थीचे प्रयत्न केले, पण सर्व व्यर्थ ठरले. डॉक्टरांनी 7.2क् वाजता त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर सुमारे 5क् मिनिटे मुंडे यांच्यावर उपचार सुरू होते. प्रारंभीची 15 मिनिटे सोडली तर उर्वरित 35 मिनिटे डॉक्टरांनी काय केले? यकृतातील जखम किंवा रक्तस्नवाची डॉक्टरांना शंका का आली नाही? कोणतीही बाह्य जखम नसताना शरीर प्रतिसाद देत नसल्याने अंतर्गत जखमांचे संकेत मिळतात. डॉक्टर म्हणतात, शरीरावर बाहेरून कोणतीही जखम नव्हती. पोलिसांनी नाकाला जखम झाल्याची माहिती दिली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे सर्वप्रथम रुग्णालयात पोहोचणा:यांमध्ये होते. या दोघांनी अपघाताबद्दल दिलेली माहितीही धक्कादायक होती. मुंडेंच्या मणक्याला मार लागल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले होते. इंडिका कारच्या चालकाची चौकशी केली जात आहे. मात्र त्यातून सत्य कितपत बाहेर येईल, हे सांगणो कठीण आहे.
प्रकाश शेंडगे आणि रामदास आठवले यांनी यातील घातपाताच्या शक्यतेवर बोट ठेवले आहे. पण त्या आधीच या घटनेमागील सर्व शक्यता पडताळून पाहण्याचे काम केंद्रीय गुप्तचरांनी सुरू केले आहे.
अनेक प्रश्न अनुत्तरित
मुंडेंना तातडीने उपचार मिळाले काय? नसेल तर त्यात किती विलंब झाला? शवविच्छेदनाचे प्रारंभीचे अहवाल पाहता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. इंडिका कार आदळल्यानंतर मुंडेंनी पिण्यासाठी पाणी मागितले, याचा अर्थ तोर्पयत ते शुद्धीवर होते. घटनास्थळापासून एम्स अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. कारण सकाळची वेळ असल्याने वाहतुकीची वर्दळ नव्हती. तातडीने तेथे पोहोचणो शक्य होते.
सिग्नल कुणी तोडला ?
इंडिका कारच्या चालकाने सिग्नल तोडत मुंडेंच्या मारुती एसेक्स 4 या कारला धडक दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मुंडेंच्या कारचा चालक घाईत होता आणि त्यानेच सिग्नल तोडल्याची अन्य एक चर्चाही समोर आली आहे.