राष्ट्रवादी युनियनला मुंढे यांचा दणका

By Admin | Updated: May 24, 2017 02:33 IST2017-05-24T02:33:05+5:302017-05-24T02:33:05+5:30

कर्मचाऱ्यांवर शिस्तीचा बडगा उगारत असताना पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय

Munde's assault on NCP union | राष्ट्रवादी युनियनला मुंढे यांचा दणका

राष्ट्रवादी युनियनला मुंढे यांचा दणका

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कर्मचाऱ्यांवर शिस्तीचा बडगा उगारत असताना पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी कर्मचारी संघटनांकडे आपला मोर्चा वळविला आहे. भाडे नियमित भरले जात नसल्याच्या कारणास्तव राष्ट्रवादी कामगार युनियनला पीएमपीच्या इमारतीतील कार्यालय सोडण्याचा आदेश त्यांनी दिला आहे.
पीएमपीच्या स्वारगेट येथील कॅन्टीन बिल्डिंग या इमारतीतील तळमजल्यावर ४२५ चौरस फूट क्षेत्रात राष्ट्रवादी युनियनचे कार्यालय आहे. ही जागा १ सप्टेंबर २०१४ रोजी युनियनला भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. हा करार ३१ आॅगस्ट २०१७ रोजी संपणार आहे. या जागेची पीएमपीच्या कार्यालयासाठी आवश्यकता असल्याने प्रशासनाने युनियनला ५ मे रोजी नोटीस बजावून १ आॅगस्टपर्यंत जागेचा ताबा देण्याचे कळविले होते. करारानुसार युनियनने दर महिन्याचे भाडे वेळेवर भरलेले नाही, असा ठपका ठेवण्यात आला.

Web Title: Munde's assault on NCP union