मुंडे, पंडित यांची दीड तास चौकशी

By Admin | Updated: July 2, 2016 04:21 IST2016-07-02T04:21:06+5:302016-07-02T04:21:06+5:30

गुरुवारी मध्यरात्रीनंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. अमरसिंह पंडित यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात हजेरी लावली.

Munde, Pandit's one and a half hour inquiry | मुंडे, पंडित यांची दीड तास चौकशी

मुंडे, पंडित यांची दीड तास चौकशी


बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणात गुरुवारी मध्यरात्रीनंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. अमरसिंह पंडित यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात हजेरी लावली. दोघांचीही दीड तास चौकशी करण्यात आली. विशेष पथकाने आतापर्यंत १०५पैकी ९४ जणांचे जबाब नोंदवले आहेत.
केज येथील विखे पाटील, अंबाजोगाईतील अंबा सहकारी साखर कारखाना व परळी येथील संत जगमित्र नागा सहकारी सूतगिरणीला जिल्हा बँकेने कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप केले होते. त्याचा तपास विशेष पथकातर्फे सुरु आहे. गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास धनंजय मुंडे, आ. अमरसिंह पंडित हे पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्यावर त्यांचे जबाब घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Munde, Pandit's one and a half hour inquiry