मुंबई : राज्यभरात उन्हाच्या झळा वाढतच असून, बुधवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद नंदुरबार येथे ४२.४ अंश सेल्सिअस झाली. मुंबईत मात्र पारा ४० हून ३४ पर्यंत घसरला. असे असले तरी आर्द्रतेमुळे अक्षरश: घामाच्या धारा वाहत असल्याचे चित्र आहे.
बुधवारी मुंबईकरांना दिलासा मिळाला. कमाल तापमान ३४ वर घसरले. उष्णतेची लाट ओसरल्याने कमाल तापमान थेट सहा अंशांनी खाली असले तरी उन्हाचा तडाखा कायम असून, उकाड्यामुळे मुंबईकरांची घामाने अंघोळ होत आहे. दरम्यान, आता मुंबईचे कमाल तापमान वरचढ राहणार असले तरी ते ३४ ते ३६ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल. शिवाय मार्च महिन्यात उष्णतेची लाट येणार नाही, अशी माहिती हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिली. परिणामी मुंबईकरांना दिलासा मिळेल.
कुठे किती पारा ?
मुंबई ३४.२ नंदुरबार ४२.४ जळगाव ४०.४ मालेगाव ३९.४ परभणी ३८.२ सोलापूर ३८ नाशिक ३७.८ डहाणू ३७.२ धाराशिव ३७.५ सांगली ३७
सोमवारी मुंबईचे कमाल तापमान ३८ , तर मंगळवारी ४० अंश होते. बुधवारी पारा ३४ अंश नोंदविण्यात आला. दिवसाच्या तापमानात मोठे फेरबदल होत आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी.कृष्णानंद होसाळीकर, हवामान तज्ज्ञ
Web Summary : Mumbai's temperature decreased from 40 to 34 degrees Celsius, offering slight relief. However, high humidity levels persist, causing discomfort and excessive sweating. The heatwave is receding, and experts predict no heatwave in March, with temperatures around 34-36 degrees Celsius.
Web Summary : मुंबई का तापमान 40 से 34 डिग्री सेल्सियस तक गिर गया, जिससे थोड़ी राहत मिली। हालांकि, उच्च आर्द्रता का स्तर बना हुआ है, जिससे असुविधा और अत्यधिक पसीना आ रहा है। हीटवेव कम हो रही है, और विशेषज्ञों ने मार्च में कोई हीटवेव नहीं होने की भविष्यवाणी की है, तापमान लगभग 34-36 डिग्री सेल्सियस रहेगा।