‘बेस्ट’च्या तोट्याचा मुंबईकरांना भुर्दंड

By Admin | Updated: May 18, 2016 05:06 IST2016-05-18T05:06:20+5:302016-05-18T05:06:20+5:30

वाहतूक विभाग आर्थिक संकटात असल्याने बेस्टने बचावाचे चार पर्याय सुचविले आहे़

Mumbaikars lose land for best | ‘बेस्ट’च्या तोट्याचा मुंबईकरांना भुर्दंड

‘बेस्ट’च्या तोट्याचा मुंबईकरांना भुर्दंड


मुंबई : वाहतूक तूट शुल्क रद्द करण्याची घोषणा भाजपाने केली खरी़ मात्र वाहतूक विभाग आर्थिक संकटात असल्याने बेस्टने बचावाचे चार पर्याय सुचविले आहे़ यामध्ये मालमत्ता करावर उपकर, वीज दरवाढ असे पर्याय आहे़ एकीकडे वाहतूक तूट रद्द होत असताना पुन्हा मुंबईकरांच्या खिशातच हात घालण्याची तयारी बेस्टने सुरू केली आहे़
वाहतूक विभागाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी बेस्ट उपक्रमाने वीज ग्राहकांकडून वाहतूक तूट वसुली म्हणजेच टीडीएलआर वसूल करण्यास सुरुवात केली़ हा भुर्दंड गेले अनेक वर्षे शहर भागातील १० लाख वीज ग्राहक उचलत आहेत़ बेस्ट समिती ताब्यात येताच भाजपाने हा कर रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली़ मात्र आर्थिक संकट तरीही कायम असल्याने बेस्ट प्रशासनाने चार पर्याय तयार ठेवले आहेत़ यातून कोणत्या ना कोणत्या मार्गाने पुन्हा मुंबईकरांवर दरवाढीची टांगती तलवार आहे़
टीडीएलआर काढल्यानंतरही वाहतूक विभागाची तूट ९०० कोटी रुपयांपर्यंत जात आहे़ त्यामुळे बेस्टचा डोलारा कसा सावरणार, असा प्रश्न बेस्ट समिती सदस्यांनी आज उपस्थित केला़ यावर उत्तर देताना, महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी चार नवीन पर्याय सुचविले़ यामध्ये मुंबईतील मालमत्तांवर उपकर आकारणे, संपूर्ण मुंबईकरांवर समान कर, वीज दरवाढ आणि राज्य सरकारकडून सबसिडी मिळवणे, बेस्टच्या तीनशे एकर जागेचा विकास करणे या पर्यायांचा समावेश आहे़
।६५० कोटींवर पाणी : कुलाबा ते सायन, चर्चगेट ते माहीम या शहर भागातील १० लाख ग्राहकांना बेस्ट वीजपुरवठा करीत आहे़ या ग्राहकांना वीज बिलांतून वाहतूक तूट शुल्कही आकारण्यात येत होते़ याद्वारे बेस्ट उपक्रमाला सुमारे ६५० कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत आहे़ हा महसूल ३१ मार्च रोजी बंद झाल्यामुळे बेस्टचे आर्थिक नुकसान वाढले आहे़

Web Title: Mumbaikars lose land for best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.