शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

मुंबईत प्राप्तिकर विभागाचे २०० अधिकारी ठेवणार अवैध व्यवहारांवर बारीक लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 7:34 AM

लोकसभा निवडणुकीत काळ्या पैशांचा वापर होऊ नये यासाठी प्राप्तिकर विभागाच्या ५० वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण २०० अधिकारी मुंबईतील व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत.

मुंबई/नागपूर - लोकसभा निवडणुकीत काळ्या पैशांचा वापर होऊ नये यासाठी प्राप्तिकर विभागाच्या ५० वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण २०० अधिकारी मुंबईतील व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत. १० लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा रोख आर्थिक व्यवहार अनधिकृत पद्धतीने होत असल्यास प्राप्तिकर विभाग त्यावर कारवाई करेल, अशी माहिती महासंचालक (अन्वेषण) किशोर व्यवहारे यांनी सोमवारी दिली.निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून तो निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधेल. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, टर्मिनल १, जुहू विमानतळ, पवनहंस हेलिपॅड या सर्व ठिकाणी एअर इंटेलिजन्स युनिट कार्यरत करण्यात आले आहे.प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात २४ तास सुरू राहणारा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तक्रार किंवा माहिती देणाºयाचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. किंबहुना माहिती देणाºयाला आपली ओळख सांगण्याची गरज नाही. आतापर्यंतदोन जणांनी दूरध्वनीद्वारे याबाबत तक्रार केली आहे, असे व्यवहारेयांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला प्राप्तिकर विभागाचे मुख्य संचालक सुमंत सिन्हा, आनंद कुमार, उपसंचालक आदित्य प्रभू देसाई, अतिरिक्त संचालक डॉ. संतोष मानकोसकर, अभिनव कुंभार हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.विदर्भ-मराठवाड्यात ‘क्यूआरटी’विदर्भ आणि मराठवाड्यासह इतर विभागांतील २४ जिल्ह्यांत ‘क्यूआरटी’ (क्विक रिस्पॉन्स टीम) तयार करण्यात आली आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाचे प्रधान संचालक ‘इन्व्हेस्टिगेशन’ (विदर्भ-मराठवाडा) जयराज काजला यांनी नागपूरमध्ये दिली. मराठवाडा व विदर्भ क्षेत्रात एकूण सहा विमानतळ आहेत. तेथेही ‘एअर इंटेलिजन्स युनिट’ तैनात करण्यात आले आहे.येथे तक्रार करता येणारनिवडणुकीत आर्थिक गैरव्यवहाराची कोणतीही तक्रार करण्यासाठी नागरिक टोल फ्री क्रमांक १८००२२१५१०, दूरध्वनी क्रमांक ०२२२२८२०५६२ व व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ९३७२७२७८२३ व ९३७२७२७८२४ यावर संपर्क साधू शकतात. 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सElectionनिवडणूक