शहरं
Join us  
Trending Stories
1
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
2
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
3
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
4
ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
5
आजचे राशीभविष्य २ जानेवारी २०२६ : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम
6
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
7
महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल
8
बंडोबांना थंड करून बिनविरोध निवडीचा नवा फंडा; मांडवली, पदांचे आमिष नाहीतर...; काही बंडखोर अज्ञात स्थळी रवाना 
9
‘मी कुठे चुकले, प्रश्न विचारण्याचा मला हक्क’; भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा घरचा आहेर
10
‘शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध यावे म्हणून विरोधकांचे उमेदवारी अर्ज करताहेत बाद’
11
मला मराठीचा आदर, मुंबईचा महापौर मराठीच होणार; भाजपनेते कृपाशंकर सिंह यांनी अखेर नमते घेतले
12
पहिली स्लीपर वंदे भारत धावणार; कती असेल भाडे?
13
जागावाटपाच्या स्वार्थात सर्वच पक्षांना जाहीरनाम्यांचा विसर? 
14
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
15
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
16
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
17
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
18
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
19
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
20
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आता मुंबई विद्यापीठात परीक्षा गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 07:47 IST

मुंबई विद्यापीठात निकालाच्या  गोंधळानंतर आता परीक्षेमधील गोंधळांना सुरुवात झाली आहे. विद्यार्थिनीला हॉल तिकीट मिळाले, परीक्षा देण्यासाठी शुक्रवारी विद्यार्थिनी केंद्रावर पोहोचली, पण विद्यापीठाकडून त्या विद्यार्थिनीचा क्रमांक परीक्षा केंद्रावर पोहोचला नसल्याने, त्या विद्यार्थिनीला परीक्षेला बसायलाच मिळाले नाही.

ठळक मुद्दे‘बीबीआय’चा पेपरविद्यार्थिनीचे नाव यादीतून गायब 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विद्यापीठात निकालाच्या  गोंधळानंतर आता परीक्षेमधील गोंधळांना सुरुवात झाली आहे. विद्यार्थिनीला हॉल तिकीट मिळाले, परीक्षा देण्यासाठी शुक्रवारी विद्यार्थिनी केंद्रावर पोहोचली, पण विद्यापीठाकडून त्या विद्यार्थिनीचा क्रमांक परीक्षा केंद्रावर पोहोचला नसल्याने, त्या विद्यार्थिनीला परीक्षेला बसायलाच मिळाले नाही. ‘डिफॉल्टर’ असल्यामुळे नाव आले नसेल, असे या वेळी तिला सांगण्यात आल्याने, आता काय करायचे? हा प्रश्न विद्यार्थिनीला सतावत आहे. बीबीआय अभ्यासक्रमाची पाचव्या सत्राची परीक्षा सुरू आहे. शुक्रवार, १0 नोव्हेंबरला ‘मार्केटिंग इन बॅकिंग अँड इन्शुरन्स’चा पेपर होता. परीक्षा देण्यासाठी विद्यार्थिनी सकाळी परीक्षा केंद्रावर पोहोचली. हॉल तिकीट क्रमांकाप्रमाणे तिने वर्ग शोधला व वर्गात गेली, पण वर्गात गेल्यावर तिला धक्का बसला. तिच्या पुढचा व मागचा क्रमांक बेंचवर होता, पण हिचाच क्रमांक लिहिला नसल्यामुळे आता काय करायचे, असे तिने त्या केंद्रावरील प्राध्यापकांना विचारले. एखादे वेळेस नंबर लिहायचा राहिला असेल, तू त्या वर्गातल्या रिकाम्या बेंचवर बस आणि पेपर दे, असे तिला सांगण्यात आले. विद्यार्थिनी दहा वाजता त्या वर्गात जाऊन बसली, पण त्या वर्गातल्या पर्यवेक्षकाने यादीत नाव नसल्याचे सांगून परीक्षेस बसण्यास मनाई केली. मीनल (नाव बदलेले आहे) बीबीआयचे शिक्षण घेत आहे. शुक्रवारी माझा पहिला पेपर होता. आधीच थोडा ताण होता. मला हॉल तिकीट मिळाले असल्यामुळे, मी निश्‍चितपणे परीक्षा केंद्रावर गेले होते, पण तिथे हा वेगळाच गोंधळ समोर आला. मी डिफॉल्टर असेन, तर मला विद्यापीठाने हॉल तिकीट कसे पाठविले? असा प्रश्न मीनलने उपस्थित केला आहे. या प्रकरणासंदर्भात मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे अध्यक्ष अर्जुन घाटुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकलेला नाही.

जबाबदार कोण?पाचव्या सत्राचा पहिला पेपर मला देता आलेला नाही. आता हे वर्ष वाया गेले, तर जबाबदार कोण? सोमवारी माझा पेपर आहे. मला कदाचित पेपर द्यायला मिळेल, पण जर त्या दिवशीही नाव यादीत नसल्यास, पेपर पाठवूनदेखील तपासणी करून मिळेल की नाही, याची शाश्‍वती नाही, असे विद्यार्थीनीचे म्हणने आहे.

टॅग्स :universityविद्यापीठeducationशैक्षणिक