शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत रिक्षा-टॅक्सी चालक मध्यरात्रीपासून जाणार संपावर

By admin | Updated: August 28, 2016 16:18 IST

ओला, उबरवर यांच्या सेवेवर कडक निर्बंध घालावेत, यासाठी टॅक्सींच्या संघटनांसह रिक्षा युनियननंही थेट संपावर जाण्याचा इशारा दिला

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 28 - ओला, उबरवर यांच्या सेवेवर कडक निर्बंध घालावेत, यासाठी आंदोलनाचे शस्त्र उपसूनही सरकार लक्ष देत नसल्याने आता काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या संघटनांसह रिक्षा युनियननंही थेट संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. ओला उबर टॅक्सींच्या निर्बंधासह अन्य मागण्यांसाठी मुंबईतल्या मुख्य रिक्षा आणि टॅक्सी संघटनांची परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत बैठक झाली. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यानं रिक्षा-टॅक्सी चालकांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. या निर्णयामुळे रिक्षा आणि टॅक्सीवर अवलंबून असलेल्या प्रवाशांचा पुढचा आठवडा जिकिरीचा जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. आज मध्यरात्रीपासून जयभगवान रिक्षा-टॅक्सी संघटनेनं संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. तर 30 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून मुंबई ऑटोमेन्सच्या रिक्षा आणि टॅक्सी संपावर जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे. दुसरीकडे 31 ऑगस्टपासून बेस्टचे कर्मचारीही संपावर जाणार असल्यानं पुढचा आठवडा हा मुंबईकर प्रवाशांसाठी जिकिरीचा ठरणार आहे. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी आणि बेस्टच्या संपात मुंबईकर वेठीस धरला जाणार आहे.

ओला, उबर कंपन्यांना एजंटचे काम करू देऊ नये, तसेच स्थानिक प्रवाशांची ने-आण करण्याची परवानगी देऊ नये, अशा मागण्या मुंबई टॅक्सीमेन्स युनियनसह अन्य काही संघटनांनी याचिकांद्वारे कोर्टातही केली आहे. याचिकांनुसार, ओला उबर एजंटची भूमिका पार पाडत आहेत. एजंट म्हणून काम करण्यासाठी आरटीओकडून परवाना घ्यावा लागतो. मात्र, या दोन्ही कंपन्यांकडे तो परवाना नाही. त्यामुळे ओला, उबरच्या टॅक्सी बेकायदेशीरपणे रस्त्यावरून धावत आहेत. या टॅक्सींना टुरिस्ट परवाना असतानाही, त्या स्थानिक प्रवाशांची ने- आण करून या टॅक्सी काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांच्या पोटावर पाय आणत आहेत.

(ओला, उबरच्या टॅक्सींवर निर्बंध घाला)

काळ्या-पिवळ्या टॅक्सींसाठी भाड्याचे दर निश्चित करण्यात आले आहेत. तथापि, ओला, उबर प्रवाशांकडून मनमानीपणे भाडे आकारले जात आहे. त्याशिवाय या टॅक्सींमधून प्रवास करणे महिलांसाठी धोकायदायक ठरत आहे. टॅक्सी चालकाला परवाना देण्यापूर्वी पोलिसांकडून चालकाच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येते, पण ओला, उबर टॅक्सीचालकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत नाही किंवा त्याच्या ठावठिकाण्याचीही माहिती घेण्यात येत नाही, असंही मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे म्हणणे आहे.