शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Rain Updates: मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार हजेरी; वसई, पालघर, भिवंडीमध्ये जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 11:08 IST

गेल्या काही दिवसात विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा मुंबईसह उपनगरात रात्री पासून दमदार हजेरी लावली आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसात विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा मुंबईसह उपनगरात रात्री पासून दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरे, भिवंडी, मीरारोड, भाईंदर, पालघर, कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पाणी साचल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

तसेच वसई- विरारमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत असून सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्याचप्रमाणे नालासोपाऱ्यातील अनेक रस्ते पाण्याखाली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचे हाल झाल्याचे समोर आले आहे. पश्चिम उपनगरातील अंधेरी, बोरीवली, कांदिवली मीरारोड तसेच ठाण्यातील कल्याण आणि डोंबिवली परिसरातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. भिवंडी आणि परिसरालाही रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक घरे आणि दुकानांत पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.  

पालघर जिल्ह्यात पहाटे चार वाजल्यापासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून रस्ते, नदी, नाले तुडुंब वाहत आहेत. पालघर- माहिम रोड, पालघर-मनोर रोड, पालघर-माहिम हायवे रोडवरही पाणी साचलं आहे. तसेच पावसाचा फटका वाहतूकाला व रेल्वेला बसल्याने पश्चिम रेल्वेवरील ट्रेन थोड्या उशिराने धावत आहे. त्याचप्रमाणे डहाणू तालुक्यात देखील रविवारी पहाटेपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाळा सुरुवात झाली. पावसाची तीव्रता अधिक असून कमी कालावधीत जास्त पाऊस झाल्याने या शहरात सखल भागात पाणी साचले असून मुख्य रस्ते पाण्याखाली गेले असून वीजही खंडीत झाली आहे.

टॅग्स :Mumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेटMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊसpalgharपालघरdombivaliडोंबिवली