मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

By Admin | Updated: April 19, 2017 10:12 IST2017-04-19T10:12:43+5:302017-04-19T10:12:43+5:30

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा एक कंटेनर अमृतांजन पुलाच्या खाली उलटला. यामुळे मुंबईकडे जाणार्‍या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे

Mumbai-Pune Expressway traffic congestion | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

>ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 19 -  मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा एक कंटेनर अमृतांजन पुलाच्या खाली उलटला. यामुळे मुंबईकडे जाणार्‍या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा एक कंटेनर अमृतांजन पुलाजवळील उतारावर येत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व कंटेनर पुलाखालीच उलटल्याने मुंबईकडे जाणारी अवजड वाहनांची लेन पूर्णपणे बंद झाली.
 
सुरुवातीला हलक्या वाहनांच्या रांगेतून संथ गतीने वाहनांची वाहतुक सुरू होती. 9.30 वाजता कंटेनर बाजूला काढण्यासाठी येथील वाहतूक थांबवण्यात आल्याने मुंबईकडे जाणार्‍या मार्गावर जवळपास दीड ते दोन किमी अंतरापर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक वलवण येथून जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वळवण्यात आली आहे. यामुळे लोणावळा व खंडाळा शहरात देखील वाहतूक कोंडी झाली होती.

Web Title: Mumbai-Pune Expressway traffic congestion