शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
4
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
5
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
6
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
7
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
8
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
9
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
10
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
11
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
12
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
13
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
14
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
15
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
16
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
17
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
18
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
19
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
20
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 11:07 IST

Private School Bus Strike: मुंबईतील खाजगी बस चालकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी १ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.

मुंबईतील खाजगी बस चालकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहेत. दरम्यान, ३० जून २०२५ आधी आमच्या मागण्या मान्य झाल्यास १ जुलैपासून अनिश्चित काळासाठी आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला . महत्त्वाचे म्हणजे, या संपामध्ये शालेय बस चालकही सहभागी होणार असल्याने पालकांना स्वत: त्यांच्या मुलांना शाळेत सोडवायला आणि शाळेतून घरी आणायला जावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, बस चालकांनी केलेल्या मागण्यांबाबत सरकार काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या संपामुळे सर्व प्रकारच्या बसेस, ज्यामध्ये स्कूल बससह, उबर सारख्या अॅग्रीगेटर बसेस आणि खाजगी वाहतुकदारांचा समावेश आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होणार असून प्रवाशांचे हाल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.सरकारने ३० जून २०२५ नंतर आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मुंबईतील विविध प्रवासी वाहतूक संघटनांनी अनिश्चित काळासाठी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुंबई बस मालक संघटनेचे मुराद नाईक म्हणाले.

बस चालकांच्या मागण्या काय?ई-चलन दंड वसूल करणे थांबवणे, विद्यमान दंड माफ करणे, जड वाहनांसाठी अनिवार्य स्वच्छता नियम रद्द करणे आणि महानगरांमध्ये प्रवेश बंदीच्या वेळेचा पुनर्विचार करणे,अशा बस चालकांच्या मागण्या आहे.  

पालकांमध्ये चिंतामुंबई शहरात मोठ्या प्रमाणात शालेय बस धावतात. अनेक शाळा त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल बसची व्यवस्था करतात. तसेच काही खासगी वाहतूक कंपन्या देखील ही सेवा पुरवतात. अशा परिस्थिती बस चालकांनी संप पुकारल्यास पालकांनाच आपल्या मुलांना शाळेत सोडवायला तसेच शाळेतून घरी आणायला जावे लागणार आहे.

टॅग्स :SchoolशाळाMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रBus DriverबसचालकStrikeसंप