मुंबई - गिरगावमधील दोन इमारतींचा काही भाग कोसळला
By Admin | Updated: August 4, 2016 23:40 IST2016-08-04T21:58:38+5:302016-08-04T23:40:39+5:30
बईतील गिरगाव परिसरात असलेल्या सीपी टॅंकजवळील वासुदेव इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटनी घडली. ही घटना गुरुवारी रात्री 8.45च्या सुमारास घडली.

मुंबई - गिरगावमधील दोन इमारतींचा काही भाग कोसळला
>ऑनलाइन लोकमत,
मुंबई, दि. ०४ - मुंबईतील गिरगाव परिसरात असलेल्या सीपी टॅंकजवळील वासुदेव आणि कुमकुम किर्ती या दोन इमारतींचा काही भाग कोसळल्याची घटनी घडली. ही घटना गुरुवारी रात्री 8.45च्या सुमारास घडली. यात अडकलेल्या चार जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
गिरगावातील वासुदेव इमारतीचा काही भाग कोसळला. त्यावेळी इमारतीच्या दुस-या मजल्यावर राहणारे 4 जण अडकले होते. नीलम जैन, नेहा जैन, डिम्पल जैन, राजूल जैन अशी अडकलेल्यांची नावे असून त्यांना अग्निशमन दलाने सुखरुप बाहेर काढले. तर, बीना देवी ही महिला जखमी झाली असून तिला जीटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तसेच, इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कोणीही राहत नव्हते. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाला होत्या. ही जुनी इमारत असल्यामुळे म्हाडाने इमारत खाली करण्याची नोटीस बजावली होती. त्यानुसार इमारत खाली करण्यात येत होती.
आम्ही चार जणी वरच्या मजल्यावर होतो. त्यावेळी खाली असलेला किचनचा काही भाग कोसळला. यावेळी आमची आई जेवन घेवून वरती आली म्हणून ती या दुर्घटनेतून बचावली. इमारतीचा हा भाग कोसळल्यानंतर आम्ही मागच्या जिन्याने खाली उतरलो. त्यानंतर आम्हाला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले, असे या इमारतीत अडकलेल्या नेहा जैन हिने सांगितले. तसेच, आम्ही म्हाडाने इमारत खाली करण्यास सांगितल्याने आम्ही दुस-या घराच्या शोधातच होतो, असेही नेहा हिने सांगितले.