शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

मुंबईमध्ये यंदाच्या मोसमातील निचांकी तापमान, राज्यात पारा घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 12:25 IST

मुंबई, पुणे, नाशिकसह सध्या राज्यात थंडीचा कडाका बराच वाढला आहे.

मुंबई- मुंबई, पुणे, नाशिकसह सध्या राज्यात थंडीचा कडाका बराच वाढला आहे. मुंबईत आज निचांकी म्हणजे 13.6 इतकं तापमान आहे. रविवारी 13.8 तापमान होतं. निफाडचं आजचं तापमान तर 7.4 अंशावर आलं आहे. तर पुण्याचा पाराही 9 अंशावर पोहोचला आहे.थंडीने मुंबईकरांची रविवारची पहाटही गारेगार केली आहे. रविवारी मुंबईचे किमान तापमान १३.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आहे. वाढत्या थंडीने मुंबईकर अक्षरश: कुडकुडले आहेत.

विशेष म्हणजे, मुंबईत दिवसाही गार वारे वाहात असल्याने, मुंबईकर खऱ्या अर्थाने हिवाळा अनुभवत आहेत. रविवारी नोंदविण्यात आलेले १३ अंश हे किमान तापमान या मोसमातील आतापर्यंतचे नीचांकी किमान तापमान आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून देण्यात आली.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी कुलाबा वेधशाळेत किमान तापमानाची नोंद १७.५ अंश सेल्सिअस तर सांताक्रुझ वेधशाळेत किमान तापमानाची नोंद १३.८ झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ८ अंश नोंदविण्यात आले आहे. कोकण, गोवा आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे.मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. ८ ते ११ जानेवारी दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. ८ आणि ९ जानेवारी रोजी मुंबईचे किमान तापमान १५ अंशाच्या आसपास राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

हुडहुडी भरली!; नाशिक नीचांकीकिमान तापमानात पुन्हा झपाट्याने घट झाल्याने राज्यात हुडहुडी जाणवू लागली आहे़ पुढील दोन दिवस गारठा असाच कायम राहणार आहे. रविवारी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे सर्वात कमी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाढत्या थंडीमुळे द्राक्षांच्या मण्यांना तडे जाण्याची भीती आहे.

नाशिक जिल्ह्यात सकाळी बोचरी थंडी जाणवते. खान्देशातही थंडीचा कडाका असून जळगावला ८.२ अंश सेल्सिअस तापमान होते. मुंबईकरांचा रविवारही गारेगार होता. रविवारी मुंबईचे किमान तापमान १३.८ अंश सेल्सिअस होते. दिवसाही गार वारे वाहत असल्याने मुंबईकर ख-या अर्थाने हिवाळा अनुभवत आहेत.

टॅग्स :TemperatureतापमानMumbaiमुंबईPuneपुणेNashikनाशिक