मुंबईकरांना थंडीची चाहूल
By Admin | Updated: November 23, 2014 01:35 IST2014-11-23T01:35:19+5:302014-11-23T01:35:19+5:30
मुंबई किमान तापमान 25 अंशांवरून थेट 19 अंशांवर घसरले आहे. किमान तापमानात तब्बल 5 अंशांची घट नोंदविण्यात आली असून, यामुळे मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली आहे.

मुंबईकरांना थंडीची चाहूल
मुंबई : मुंबई किमान तापमान 25 अंशांवरून थेट 19 अंशांवर घसरले आहे. किमान तापमानात तब्बल 5 अंशांची घट नोंदविण्यात आली असून, यामुळे मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली आहे.
अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र, चक्रीवादळ, कमी दाबाच्या पट्टय़ामुळे झालेला पाऊस, अशा अनेक कारणांमुळे मुंबईसह राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार नोंदविण्यात येत होते. शिवाय मुंबईच्या किमान तापमानाचा पारादेखील 25 अंश एवढा नोंदविण्यात येत होता. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे किमान तापमानात 2 अंशांची घट नोंदविण्यात आली होती. परंतु पुन्हा ढगाळ वातावरणामुळे हवामानात झालेल्या बदलामुळे किमान तापमान 25 ते 26 अंशांवर पोहोचले होते.
दरम्यान, उत्तरेकडून दक्षिणोकडे वाहणा:या थंड वा:यालाच विलंब झाल्याने नोव्हेंबर महिना संपत आला तरी मुंबईकरांना थंडीने चाहूल दिली नव्हती. परंतु दोन दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशच्या पूर्व भागात दाखल झालेल्या थंड वा:याने आता सलामी
दिल्याने राज्यासह मुंबईच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात येऊ लागली आहे.
गुरुवार आणि शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी मुंबईतील वातावरण काहीसे दिलासादायक झाले असून, थंड वा:याचा जोर वाढल्यानंतर किमान तापमानासह कमाल तापमानही खाली येईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या वतीने देण्यात आली. (प्रतिनिधी)
च्विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे.
च्प्रमुख शहरांतील किमान तापमान - पुणो 15़2, कोल्हापूर 2क्, महाबळेश्वर 15़3, नाशिक 13़4, सांगली 17, औरंगाबाद 15, चंद्रपूर 16, नागपूर 12़4, वर्धा 14़2, यवतमाळ 13़
च्पुढील 24 तासांत मुंबईतील आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान
34, 2क् अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल.