मुंबई इंडियन्सचे चेन्नईला १५८ धावांचे आव्हान

By Admin | Updated: May 10, 2014 21:31 IST2014-05-10T21:31:46+5:302014-05-10T21:31:46+5:30

मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघासमोर १५८ धावांचे आव्हान ठेवले आहे.

Mumbai Indians chasing a target of 158 runs | मुंबई इंडियन्सचे चेन्नईला १५८ धावांचे आव्हान

मुंबई इंडियन्सचे चेन्नईला १५८ धावांचे आव्हान

 ऑनलाइन टीम 

मुंबई, दि. १० - मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघासमोर १५८ धावांचे आव्हान ठेवले आहे. 
प्रथम फलंदाजी करणा-या मुंबई इंडियन्स संघाची घरच्या मैदानावर खेळताना सुरूवात ही फारशी चमकदार झाली नाही. सलामीला आलेला गौतम अवघ्या ९ धावा काढून तंबूत परतला. सिमोन्सच्या ३८, अंबाती रायडूच्या ५९ आणि रोहित शर्माच्या १९ धावा वगळता मुंबईचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरू शकला नाही. शेवटच्या काही शटकात मुंबई इंडियन्सच्या एकापाठोपाठ एक विकेट पडल्या आणि मुंबई इंडियन्स संघाने २० षटकात ६ गडी गमावत १५७ धावा केल्या. 

Web Title: Mumbai Indians chasing a target of 158 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.