शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 15:35 IST

Akshay Shinde Encounter Hearing : आरोपीने अचानक पोलीस अधिकाऱ्यांनी कंबरेला लावलेले पिस्तूल खेचले आणि तीन गोळ्या झाडल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला. यावरून स्वत: ५०० गोळ्या झाडण्याचा अनुभव असलेल्या न्यायाधीशांनी सरकारी वकिलांवरच प्रश्नांच्या फैरी सुरु केल्या. 

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी शिंदेच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आज सुनावणी झाली. यामध्ये आपल्या मुलाचा एन्काउंटर करून त्याचा विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय वापर केला जाणार असल्याचा आरोप अण्णा शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांच्या वतीने वकील अमित कटारनवरे यांनी युक्तीवाद केला. यानंतर कोर्टाने सर्व प्रकरण ऐकून घेत पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली. 

या संपूर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे. देवाभाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय असे मेसेज सोशल मीडिया, बॅनरद्वारे फिरू लागले आहेत. मग न्यायव्यवस्थेची गरजच काय असा सवाल याचिकाकर्त्या शिंदेंनी केला आहे. मुंबई हायकोर्टात न्यायाधीश चव्हाण यांच्यासमोर ही सुनावणी झाली. आरोपीने अचानक पोलीस अधिकाऱ्यांनी कमरेला लावलेले पिस्तूल खेचले आणि तीन गोळ्या झाडल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला होता. यावरून स्वत: पिस्तुल चालवण्याचा अनुभव असलेल्या न्यायाधीशांनी सरकारी वकिलांवरच प्रश्नांच्या फैरी सुरु केल्या. 

अक्षय शिंदेच्या डोक्यातच का गोळी मारण्यात आली. पोलीस गोळी डोक्यात मारतात की पायावर असे सवाल न्यायालयाने विचारले. तीन गोळ्या झाडल्या तर उरलेल्या दोन कुठे गेल्या? चार पोलीस एका व्यक्तीला नियंत्रित करू शकत नव्हते का? असा सवाल करत ज्या पोलिसाला गोळी लागली त्याचा लागलेली गोळी आरपार गेली की घासून गेली, असाही सवाल न्यायाधीशांनी केला. 

ते पिस्तुल होते की रिव्हॉल्व्हर?

न्यायाधीशांनी पोलिसांना अक्षयने खेचले ते पिस्तुल होते की रिव्हॉल्व्हर होते, असा पहिला सवाल केला. यावर सरकारी वकिलांनी ते पिस्तूल होते असे सांगताच न्यायाधीशांनी दुसरा प्रश्न केला. 

पिस्तूलचे लॉक उघडून ते लोड करून फायर केले का? असा सवाल कोर्टाने विचारला. यावर वकिलांनी ते कसे फायर केले गेले हे सांगितले. यावर न्या. चव्हाण यांनी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पटत नाहीत, सामान्य व्यक्ती या पिस्तुलचे ट्रेनिंग घेतल्याशिवाय गोळ्या झाडू शकत नाही, असे म्हणत सरकारी वकिलांचा बचाव नाकारला. 

तुम्ही कधी पिस्तूल चालवले आहे का?

सामान्य व्यक्तीला स्लायडर मागे खेचता येणार नाही, तुम्ही कधी ते चालवले आहे का असा प्रतिसवाल कोर्टाने वकिलांना केला. मी स्वत: 500 राऊंड फायर केलेले आहेत, यामुळे काही गोष्टी या मलाच न पटणाऱ्या आहेत असे न्या. चव्हाण यांनी म्हटले. 

संशयित आरोपी अक्षय शिंदे सोबत गाडीत चार प्रशिक्षित पोलीस होते. यात एक एन्काउंटर स्पेशालिस्ट होता. या सर्वांवर वरचढ ठरून आरोपी पिस्तूल कशीकाय हिसकावू शकतो, असा सवाल न्यायाधीशांनी विचारला. 

किती लांबून गोळी झाडली गेली?

ज्या अधिकाऱ्याने एन्काउंटर केला तो कोणत्या बॅचचा अधिकारी होता? गोळी कुठून चालविण्यात आली. किती लांबून गोळी झाडली गेली? डोक्यातून आरपार झाल्यावर कुठे गेली? ही गोळी नेमकी कुठे लागली? याचा फॉरेन्सिक रिपोर्ट तयार करावा. त्या शस्त्राचा फॉरेन्सिक रिपोर्ट केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे न्यायाधीशांनी स्पष्ट निर्देश दिले. 

पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावर?

अक्षय शिंदेंच्या डोक्यातच गोळी का मारली? पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावर? आरोपीवर नियंत्रण का मिळवलं नाही, गोळी का मारली? 3 गोळ्या मारल्या, एक लागली, मग इतर दोन गोळ्या कुठे? 4 पोलीस एका आरोपीला कंट्रोल करु शकत नव्हते का? पोलिसांची पिस्तुल अनलॉक का होती? असा सवालही हायकोर्टाने उपस्थितीत केला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयbadlapurबदलापूरCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई