महाडजवळ मुंबई-गोवा हायवे ठप्प

By Admin | Updated: June 24, 2016 21:04 IST2016-06-24T20:58:29+5:302016-06-24T21:04:17+5:30

पावसाचा जोर कायम असल्याने महामार्गावर कोसळलेले झाड हटविण्यात अडथळा निर्माण झाला आहे.

Mumbai-Goa highway jam near Mahad | महाडजवळ मुंबई-गोवा हायवे ठप्प

महाडजवळ मुंबई-गोवा हायवे ठप्प

ऑनलाइन लोकमत

महाड, दि. 24 - पावसाचा जोर कायम असल्याने महामार्गावर कोसळलेले झाड हटविण्यात अडथळा निर्माण झाला आहे. शासन यंत्रणा अपुरी असल्याने वाहतूक सुरळीत होण्यास किमान दीड तास लागणार असल्याने वाहतूक राजेवाडी मार्गाने वळविण्यात आली आहे.  महाड येथे विसावा हॉटेलजवळ भर रस्त्यात झाड कोसळून राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्याने ट्रॅफिक जाम झालं. दोन्ही बाजूने 7 ते 8 किमीपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. दोन्ही बाजूने लांबच लांब रांगा लागल्याने व उलट सुलट वाहने टाकल्याने ट्रॅफिक सुरळीत करण्यास विलंब होत आहे. या झाड हटवण्यासाठी PWD विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

Web Title: Mumbai-Goa highway jam near Mahad