शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

ही आहेत मुंबईजवळील ट्रेकर्सची आवडती ८ ठिकाणं, तुम्ही जाऊन आलात का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2018 7:26 PM

मुंबई : मार्च महिन्याची सुरुवात झाली असून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काय करायचं हा प्रश्न एव्हाना सर्वांना पडला असेल. आम्ही तुम्हाला हे काही पर्याय सुचवत  आहोत जिथे या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही जाऊ शकता.  ही सर्व ठिकाणं मुंबई पासून काही किमी अंतरावर असल्याने जास्त लांबचा प्रवास करण्याची गरजही पडणार नाही.1. देवकुंड धबधबामुंबईपासून सुमारे 150 किमी अंतरावर ...

ठळक मुद्देमार्च महिन्याची सुरुवात झाली असून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काय करायचं हा प्रश्न एव्हाना सर्वांना पडला असेलआम्ही तुम्हाला हे काही पर्याय सुचवत  आहोत जिथे या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही जाऊ शकता.ही सर्व ठिकाणं मुंबईपासून काही किमी अंतरावर असल्याने जास्त लांबचा प्रवास करण्याची गरजही पडणार नाही.

मुंबई : मार्च महिन्याची सुरुवात झाली असून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काय करायचं हा प्रश्न एव्हाना सर्वांना पडला असेल. आम्ही तुम्हाला हे काही पर्याय सुचवत  आहोत जिथे या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही जाऊ शकता.  ही सर्व ठिकाणं मुंबईपासून काही किमी अंतरावर असल्याने जास्त लांबचा प्रवास करण्याची गरजही पडणार नाही.

1. देवकुंड धबधबा

मुंबईपासून सुमारे 150 किमी अंतरावर असणाऱ्या कोलाड येथील भिरा गावाजवळ असलेलं देवकुंड धबधबा आहे. स्वच्छ पाणी व ट्रेकिंगसाठी सोपे असलेल्या या ठिकाणी तीन धबधब्यांचा संगम होतो व भलामोठा देवकुंड धबधबा तयार होतो.

2. विजापूरचा किल्ला

मुंबईपासून 100 किमी दूर लोणाववळ्याजवळ व माळवली स्टेशनपासून 5 किमीवर विसापूरचा किल्ला आहे. या किल्ल्याच्या आतमध्ये सुंदर लेणी पाहायला मिळतील. विशेषतः येथे वेगळ्या प्रकारची जुनी घरंदेखील अद्यापपर्यंत आहेत. किल्ल्याच्या टोकावर जाण्यासाठी जवळपास 1 तास लागतो पण रस्त्यात तुम्हाला पवना धबधब्याची मजाही लुटता येते. 

3. ड्युक्स नोज 

विकेन्ड अगदी मुंबईपासून जवळ तसंच शांत ठिकाणी घालवायचा असेल तर मुंबईपासून जेमतेम तीन तासांचच्या अंतरावर आहे. मुंबई ,पुणे व जवळील परिसरातील तरुण पर्यटक येथे ट्रेकिंगचा आनंद लुटतात. विशेष म्हणजे, ड्युक्स नोज हे येथे एक जवळच शिखर आहे तेथून पर्यटकांना खंडाळा आणि भोर घाटाच्या नैसर्गिक सौंदर्याचा देखावा नजरेत सामावता येतो.

4. राजमाची

लोणावळ्यातील प्रसिद्ध किल्ला म्हणजे राजमाची. सह्याद्रीच्या पर्वतरांगा व शिरोता धबधब्याचं किल्ल्यावरून दिसणारं दृश्य ट्रेकर्सना आकर्षित करतं. पावसाळ्यात व हिवाळ्यात राजमाचीला भेट नक्की द्या.

5. अलंग आणि मदन

मुंबईतील सर्वात कठीण ट्रेकिंग स्पॉट म्हणून हे ठिकाण ओळखले जाते. या ठिकाणी कुलांग, कुलनवाडी, मदन असे तीन किल्ले असून कुलांग हा चढण्यासाठी सर्वात कठीण आहे. त्यामुळे इथे ट्रेकिंगला जाणार असाल तर तुमच्या संयम, धाडस आणि शक्तीची परीक्षाच असते. 

6. ताम्हिणी घाट 

मुळशी धबधब्याच्या जवळच असलेलं हे ठिकाण अगदी उंचावर आहे. रस्त्यावरून पाहिलं तर हा घाट अगदी प्रशस्त दिसतो. हा घाट इथे असणारी हिरवळ, व्हॅली आणि धबधब्यांमुळे प्रसिद्ध आहे. त्यामुळेच ट्रेकिंगला येणाऱ्या प्रत्येकाला ताम्हिणी घाटाचं आकर्षण असतं.

7. कळवणी दुर्ग

प्रभळ गडाच्या शेजारीच असलेल्या हा किल्ला ट्रेकर्सच्या सर्वाधिक पसंतीचा किल्ला आहे. या गडावर पोहोचण्यासाठी पायऱ्या नसून आपल्याला स्वत:ला मार्ग तयार करावा लागतो. धाडसी ट्रेकर्संना इथे ग्रुप ट्रेकिंगचीच गरज असते.8. हरिहर किल्ला  

नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्षगड आहे. हा किल्ला  प्राचीन काळात बांधला गेलेला आहे. हा किल्ला इतिहासकाळात शेजारच्या त्र्यंबकगडा पाठोपाठ या भागातील महत्त्वाचा दुसरा किल्ला आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो.

टॅग्स :Travelप्रवासtourismपर्यटनMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई