मुंबई - डेव्हिड ससून औद्योगिक संस्थेतून १० मुले पळाली

By Admin | Updated: August 13, 2016 01:53 IST2016-08-13T01:53:16+5:302016-08-13T01:53:16+5:30

गेल्या महिन्यात अल्पवयीन मुलाच्या अनैसर्गिक अत्याचाराच्या घटनेने चर्चेत आलेल्या माटूंगा येथील डेव्हिड ससून औद्योगिक संस्थेतून १० मुले पळाल्याने येथील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Mumbai - 10 children fled from the David Sasun Industrial Society | मुंबई - डेव्हिड ससून औद्योगिक संस्थेतून १० मुले पळाली

मुंबई - डेव्हिड ससून औद्योगिक संस्थेतून १० मुले पळाली

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - गेल्या महिन्यात अल्पवयीन मुलाच्या अनैसर्गिक अत्याचाराच्या घटनेने चर्चेत आलेल्या माटूंगा येथील डेव्हिड ससून औद्योगिक संस्थेतून १० मुले पळाल्याने येथील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

रात्रीच्या अंधाराचा फ़ायदा घेत येथील इमारतीवरुन उड्या मारुन या मुलांनी पळ काढला. दरम्यान, मुलांची नियमित हजेरी सुरु असताना १० मुले कमी असल्याचे संस्थेच्या निदर्शनास आले. त्यानंतर अद्याप या मुलांचा काहीही शोध लागलेला नाही.ट

याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Web Title: Mumbai - 10 children fled from the David Sasun Industrial Society