शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

मुनगंटीवारांचं ते वक्तव्य म्हणजे, 'मुंगेरीलाल के हसीन सपने'; अशोक चव्हाणांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 14:44 IST

भाजपकडून सातत्याने महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांमध्ये वितुष्ठ निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे माध्यमांना माझी विनंती आहे की, त्यांनी भाजपचं जास्त ऐकू नये, असही अशोक चव्हाण यांनी सांगितले.

मुंबई - शिवसेनेने सत्तास्थापनेचा उद्याही प्रस्ताव दिला तर भाजपा शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास तयार असल्याचे मत भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले होते. त्यावर आता काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे. मुनगंटीवार यांचे वक्तव्य म्हणजे 'मुंगेरीलाल के हसीन सपने' असल्याचा टोला चव्हाण यांनी लगावला. 

नांदेडच्या दौऱ्यावर असताना भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. तसेच शिवसेना हा पक्ष भाजपाचा नैसर्गिक मित्र आहे. शिवसेनेनं उद्याही प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापन करण्यासाठी भाजपकडून अडचण नाही. सारे काही विसरून शिवसेनेने भाजपपुढे प्रस्ताव ठेवल्यास 'सुबह का भुला श्याम को लौट आया' असे समजून आम्ही त्याचा विचार करू असंही मुनगंटीवार म्हणाले होते. 

मुनगंटीवार यांचे शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेसंदर्भातील वक्तव्य म्हणजे 'मुंगेरीलाल के हसीन सपने' असच म्हणावे लागेल. भाजपकडून सातत्याने महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांमध्ये वितुष्ठ निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे माध्यमांना माझी विनंती आहे की, त्यांनी भाजपचं जास्त ऐकू नये, असही अशोक चव्हाण यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या इंदिरा गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला. तसेच आव्हाडांनी खुलासा केल्यानंतर तो विषय संपल्याचे म्हटले.