शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

एमटीडीसीच्या फायद्यातील मालमत्तांच्या खासगीकरणाचा घाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 07:06 IST

राज्यभरातील रिसॉर्ट; कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची भीती

- अतुल कुलकर्णीमुंबई : गणपतीपुळे, महाबळेश्वर, माथेरान, हरिहरेश्वर येथील रिसॉर्टस आणि मिटबाव, ताडोबा आणि फर्दापूर येथील एमटीडीसीच्या जागांचे खासगीकरण करण्याचा निर्णय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ घेत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. हे सगळे रिसॉर्ट फायद्यात चालणारे आहेत. कोरोनामुळे आता राज्यातंर्गत होणारे पर्यटन वाढण्याची शक्यता असताना फायद्यातल्या प्रकल्पांचे खासगीकरण केले जात आहे.एमटीडीसीचे रिसॉर्ट सामान्य, मध्यमवर्गीय पर्यटकांना कायम आपलेसे वाटतात. कारण ते परवडणाºया दरात असतात. त्यामुळे त्यांची पहिली पसंती येथेच असते. आता त्याच जागांचे जर खासगीकरण केल्यास सामान्यांना ही सोय देखील बंद होईल. मुळात या ठिकाणी महागड्या दराच्या पंचातारांकित सोयी उपलब्ध असताना हा आग्रह कशासाठी?, असा सवाल उपस्थित होत आहे. गणपतीपुळेची जागा ४७.४६ एकर, महाबळेश्वरची १५ एकर, माथेरानची ३.६० एकर व हरिहरेश्वरची १४.९५ एकर जागा आहे. तर मिटबावची २४५.६१ एकर, ताडोबाची ७.४१ एकर आणि फर्दापूरची ४६३.८७ एकर जागा आहे. या जागा एखाद्या बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. या खासगीकरणाला येथील कर्मचाºयांचा विरोध आहे. या कोरोना लॉकडाऊन काळात कर्मचाºयांनी सर्व रिसॉर्ट आणि रेस्टॉरंन्टची देखभाल केली आहे.स्थळ              एकूण कक्ष      तीन वर्षांचा निव्वळ नफागणपतीपुळे            १२१                   ८६३.९४ लाखमहाबळेश्वर             ७६                   ३८८.७३ लाखमाथेरान                  ३५                    १०१.०४ लाखहरिहरेश्वर               २६                    ९५.९७ लाखएमटीडीसीमध्ये सध्या नियमित आणि प्रतिनियुक्तीवर 163 अधिकारी कर्मचारी आहेत.महामंडळाच्या आस्थापनेवर 62 कंत्राटी कर्मचारी आहेत.पुरवठादारांच्या मार्फत 530 कंत्राटी कर्मचारी आहेत. राज्यात एमटीडीसीच्या एकूण १७२ मालमत्ता आहेत. ज्यांची किंमत आज 735 कोटी आहे.मोकळ्या जागा ४९ आहेत.दीर्घ भाडेपट्टीवर 22 तर लघू भाडेपट्टीवर २७ जागा दिलेल्या आहेत. 08 उपहारगृहे व ४२ इतर मालमत्ता आहेत.या आधी झालेल्या खासगीकरणामुळे ठराविक लोकांचा फायदा झाला होता. आता निर्णय घेताना ताज किंवा त्यासारखे मोठे समूह यात यावेत, जेणे करुन ते ही सगळी मालमत्ता नीट सांभाळू शकतील. शिवाय त्यात सरकारची भागीदारी असावी. या आधीचे अनुभव चांगले नव्हते. शिवाय खासगीकरण करताना येथे काम करणाºया कर्मचाºयांच्या नोकºयांवर गदा आणू नये, अशी आपली मागणी आहे.- सचिन अहिर, अध्यक्ष,महाराष्टÑ पर्यटन कर्मचारी संघ