शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

महावितरणला थकबाकीचा शॉक; पुरवठा खंडित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:13 AM

सर्व प्रकारच्या वीजग्राहकांकडे सुमारे ३९ हजार कोटी रुपयांची वीज बिले थकीत असल्याने महावितरणला थकबाकीचा चांगलाच शॉक बसला असून, त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. वीजखरेदीसह ग्राहकसेवेसाठी अत्यावश्यक असलेल्या दैनंदिन संचालन तसेच देखभाल व दुरुस्तीवर मोठा परिणाम होत आहे.

मुंबई : सर्व प्रकारच्या वीजग्राहकांकडे सुमारे ३९ हजार कोटी रुपयांची वीज बिले थकीत असल्याने महावितरणला थकबाकीचा चांगलाच शॉक बसला असून, त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. वीजखरेदीसह ग्राहकसेवेसाठी अत्यावश्यक असलेल्या दैनंदिन संचालन तसेच देखभाल व दुरुस्तीवर मोठा परिणाम होत आहे. यावर मात करण्यासाठी थकबाकी वसुलीची मोहीम महावितरणकडून राज्यात राबविण्यात येत आहे.राज्यातील सर्व प्रकारच्या सुमारे १ कोटी ४१ लाख ग्राहकांकडे जानेवारी २०१८ अखेरीस एकूण थकबाकी ३९ हजार कोटी आहे. या थकबाकीत ५७ लाख ५६ हजार घरगुती ग्राहकांकडे सुमारे १ हजार ५०० कोटी, ५ लाख ७३ हजार वाणिज्यिक ग्राहकांकडे सुमारे ४७८ कोटी, १ लाख ५ हजार उच्च व लघुदाब औद्योगिक ग्राहकांकडे ८४७ कोटी, ४१ हजार सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे १ हजार ५०० कोटी, ७९ हजार पथदिवे ग्राहकांकडे सुमारे ३ हजार ३०० कोटी, ३८ लाख कृषी ग्राहकांकडे सुमारे २३ हजार कोटी, ५७ हजार इतर ग्राहकांकडे सुमारे ७९ कोटी रुपयांचा समावेश आहे. राज्यात ३ लाख ५७ हजार कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या थकबाकीदार ग्राहकांकडे ७ हजार कोटींची थकबाकी आहे. महावितरणने थकबाकी वसुलीसाठी थेट वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे.थकीत अंदाजित रक्कम१ कोटी ४१ लाख : एकूण थकबाकीदार ग्राहक३९ हजार कोटी : जानेवारी २०१८ अखेरीस एकूण थकबाकी१,५०० कोटी : ५७ लाख ५६ हजार घरगुती ग्राहकांकडील थकीत रक्कम४७८ कोटी १ लाख ५ हजार : ५ लाख ७३ हजार वाणिज्यिक ग्राहकांकडील थकीत रक्कम८४७ कोटी : उच्च व लघुदाब औद्योगिक ग्राहकांकडील थकीत रक्कम१,५०० कोटी : ४१ हजार सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडील थकीत रक्कम३,३०० कोटी : ७९ हजार पथदिवे ग्राहकांनी थकविलेली रक्कम२३ हजार कोटी : ३८ लाख कृषी ग्राहकांकडील थकीत रक्कम९३८ कोटी : ४५ हजार २१९ यंत्रमाग ग्राहकांकडील थकीत रक्कम७९ कोटी : अन्य ५७ हजार ग्राहकांनी थकविलेली रक्कम

टॅग्स :mahavitaranमहावितरण