शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

MPSC News : 'एमपीएससी'कडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा; परिक्षार्थींची संख्या पोहचली २६ लाखांच्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 11:11 IST

राज्य शासनाकडून आयोगाच्या कर्मचार्‍यांच्या संख्येत वाढ करण्याऐवजी घट केली जात आहे.

ठळक मुद्देशासनाला महाराष्ट्र लोकसेवा आयोग गुंडाळून ठेवायचा आहे का ?असा प्रश्न उपस्थित

राहुल शिंदे - 

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या दहा वर्षात ५ लाखांहून २६ लाखांपर्यंत वाढली आहे. मात्र , राज्य शासनाकडून आयोगाच्या कर्मचार्‍यांच्या संख्येत वाढ करण्याऐवजी घट केले जात आहे. त्यामुळे आयोगाला मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे.

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी एमपीएससी करून घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांना प्रविष्ट होतात. दरवर्षी त्यात वाढ होत आहे. २०१०-११ यावर्षी आयोगाकडे परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५ लाख ६५ हजार 839 एवढी होती तर ही संख्या २०१८ १९ मध्ये २६ लाख ६४ हजार ४१ एवढी झाली. आयोगाकडे दिवसेंदिवस परीक्षांचा ताण वाढत आहे.अशा परिस्थितीत राज्य शासनाने आयोगाची सहाय्यक कक्ष अधिकारी संवर्गाची ८ व लिपिक टंकलेखक कर्मचारी वर्गाची १६ पदे कमी करण्याचा निर्णय घेतला. आयोगाने शासनाला मनुष्यबळ बाबत निर्माण झालेल्या अडचणी तसेच वस्तुस्थिती सांगितली. मात्र त्यानंतर आहे.शासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही.        महापरीक्षा पोर्टल सह राजपत्रित गट ब व गट क दर्जाच्या पदांची भरती आयोगामार्फत करता येऊ शकते, याबाबतचा पत्रव्यवहार आयोगातर्फे राज्य शासनाकडे करण्यात आला होता. मात्र, तरीही शासन याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत नाही. त्यामुळे शासनाला महाराष्ट्र लोकसेवा आयोग गुंडाळून ठेवायचा आहे का ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.-------------------------------------------वर्ष                    परीक्षेस अर्ज करणारे विद्यार्थी२०१०-११              ५,५६,८३९२०११-१२              ५,६७,५०१२०१२-१३              ८,३४,५७२२०१३-१४             ११,०५,३०५२०१४-१५             ४,५२,४०७२०१५-१६            ५,२९,६९३२०१६-१७            ११,३४,२००२०१७-१८            १७,४१,०६९२०१८-१९            २६,६४,०४१---------------------------------गेल्या दहा वर्षात आयोगाच्या परीक्षा विविध देणाऱ्या विद्यार्थी संख्येत  वाढ झाली आहे. त्या तुलनेत कर्मचारी संख्या वाढली नाही. आयोगाला पुरेसे मनुष्यबळ दिले तरच ते परिणामकारकपणे काम करू शकते. त्यामुळे आढावा घेऊन आयोगाला पुरेसे मनुष्यबळ द्यायला हवे. - व्ही.एन. मोरे,माजी अध्यक्ष ,एमपीएससी

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकार