शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

भुजबळ, वडेट्टीवारांच्या विरोधानंतरही पुढे ढकलली ‘एमपीएससी’ परीक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 6:29 AM

MPSC Exam Postponed: लॉकडाऊनचे दिले कारण; मुख्यमंत्री म्हणाले, विद्यार्थ्यांची होती मागणी

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) येत्या रविवारी (दि.११) होणारी पूर्वपरीक्षा मराठा नेत्यांच्या दबावानंतर मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, परीक्षेची तयारी झालेली नाही आणि लॉकडाऊनमुळेही अडचणी आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांचीही मागणी होती, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलू नये, असे आग्रही मत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि बहुजन विकास विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले होते. तर, परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी मराठा नेते गेले दोन दिवस मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करीत होते.आज मुख्यमंत्र्यांनी काही मंत्र्यांसमवेत मराठा नेत्यांशी पुन्हा चर्चा केली व नंतर मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, जलसंपदामंत्री जयंत पाटील, ओबीसी विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहनमंत्री अनिल परब यांची बैठक झाली आणि तीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.संभाजीराजे-वडेट्टीवार यांच्यात शाब्दिक खडाजंगी‘वेळ येईल तेव्हा तलवार बाहेर काढेन’ या खासदार संभाजीराजे यांच्या विधानावरून त्यांच्यात आणि बहुजन विकास विभाागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात शुक्रवारी वाक्युद्ध रंगले. मराठा व ओबीसींमध्ये फूट पाडण्याचा काहींचा प्रयत्न आहे, पण आम्ही ते होऊ देणार नाही. संयम कधी सोडायचा, ते आम्हाला माहिती आहे. आम्ही तलवार सतत काढत नाही, वेळ आली की जरूर काढू, असा इशारा संभाजीराजे यांनी तुळजापूर येथे दिला. त्यावर ‘तलवार कोणाच्या विरोधात उपसणार’ असा उपरोधिक सवाल वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केला.दोन मंत्र्यांचा विरोधकशासाठी?मराठा आरक्षणाबाबतचा अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयात कधी होईल, याची कल्पना नाही. मराठा समाजातील अनेक तरुण कुणबी म्हणून ओबीसीत आले आहेत. काही खुल्या प्रवर्गातून येतात आणि परीक्षा देतात. आता परीक्षा पुढे ढकलली तर उमेदवारांच्या वयोमर्यादेचा प्रश्न येईल, बाकीही गुंतागुंत निर्माण होईल. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीचा मराठा नेत्यांनी पुनर्विचार करावा, असे आवाहन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना केले. दुसरीकडे वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आजच्या बैठकीतही परीक्षा रद्द न करण्याचा आग्रह धरला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.कधी होणार पूर्वपरीक्षा?परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल. लॉकडाऊनमुळे या आधीही दोनवेळा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, यानंतर जी तारीख जाहीर होईल, त्याच तारखेला परीक्षा होईल. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्रीका घेतला निर्णय?गेले चार महिने अभ्यासिका, महाविद्यालये बंद आहेत. अभ्यासाला पुरेसा अवधी मिळाला पाहिजे, अशी विद्यार्थ्यांची सूचना होती.सर्व समाजांच्या विद्यार्थ्यांचा विचार करून आजचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यात परीक्षेबाबत संभ्रमावस्था होती. काही विद्यार्थी कोरोनाग्रस्तही आहेत, हे लक्षात घेता परीक्षा पुढे ढकलली जात आहे.एमपीएससीशी चर्चा करून नवीन तारीख जाहीर केली जाईल. मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोवर परीक्षा होणार नाही का? या पत्रकारांच्या प्रश्नास मुख्यमंत्र्यांनी बगल दिली.त्या सर्वांना देता येणार परीक्षामुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले की, रविवारी होणाऱ्या परीक्षेसाठी जे विद्यार्थी पात्र होते, त्या सर्वांना पुढे जाहीर होणाºया तारखेला परीक्षा देता येईल. त्यांना वयोमर्यादा संपली म्हणून नाकारले जाणार नाही.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाChagan Bhujbalछगन भुजबळVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती