शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

MPSC EXAM : परीक्षेवेळी तीनपदरी मास्क उमेदवारांसाठी अनिवार्य, काेराेनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 08:08 IST

परीक्षा केंद्रात प्रवेश करताना मास्क, हातमोजे, सॅनिटायजरची लहान पिशवी असलेले प्रत्येकी एक किट उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येईल.

मुंबई : एमपीएससीची राज्य पूर्व  सेवा परीक्षा २१ मार्च रोजी असून, परीक्षेवेळी कोविड संदर्भात घ्यावयाची काळजी या अनुषंगाने उमेदवारांना एमपीएससीकडून काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार उमेदवारांनी परीक्षा उपकेंद्रात प्रवेश करताना किमान तीन पदरी कापडाची मुखपट्टी (मास्क) घालणे अनिवार्य आहे. तसेच परीक्षा केंद्रात प्रवेश करताना मास्क, हातमोजे, सॅनिटायजरची लहान पिशवी असलेले प्रत्येकी एक किट उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येईल. ज्याचा वापर उमेदवारांनी दोन्ही सत्राकरिता करणे बंधनकारक आहे. (MPSC EXAM: Mandatory for three-tiered mask candidates during the examination) २१ मार्च २०२१ रोजी होणाऱ्या राज्य सेवा सेवा पूर्व परीक्षेसाठी राज्यात ८०० केंद्रे आहेत. तब्ब्ल २ लाख ८३ हजार विद्यार्थी ही परीक्षा देतील. राज्यातील कोविड १९च्या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता उमेदवारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आयोगाकडून विहित केलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार (एसओपी) कोविड १९ ची लक्षणे असलेल्या उमेदवारांनी उपकेंद्रावरील पर्यवेक्षीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना याची आगाऊ कल्पना देणे गरजेचे आहे. त्यनुसार त्यांच्यासाठी वेगळी साेय करण्यात येणार आहे.जेणेकरून उमेदवारांना मुखपट्टी, हातमोजे, फेसशील्ड, मेडिकल गाऊन, शु कव्हर, मेडिकल कॅप इत्यादी असलेले पीपीई किट उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच त्या परीक्षार्थी उमेदवाराची स्वतंत्र कक्षात व्यवस्था करण्यात येईल.

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन गरजेचेशारीरिक अंतर राखण्याच्या आनुषंगाने विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वापरलेले टिश्यू, मास्क, सॅनिटायजर्सची बाटली इत्यादी वस्तू परीक्षा उपकेंद्रावरील आच्छादित कचराकुंडीत टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थी