शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

MPSC Exam: मोठी बातमी! आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षेची घोषणा, 666 पदांसाठी जाहिरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 2:29 PM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब 2021 ची 666 पदांची जाहिरात जारी केली आहे.

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने(MPSC)काही दिवसांपूर्वीच राज्यसेवेची जाहिरात आणली होती. त्यानंतर आता आज एमपीएससीने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात जारी केली आहे. एमपीएससीने यंदा 666 पदांसाठी ही जाहिरात जारी केली आहे. 

एमपीएससीने जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार, पोलिस उपनिरिक्षक 376, राज्य कर निरीक्षक 190 आणि सहायक कक्ष अधिकारी 100 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही परीक्षा 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.

अर्ज कधी दाखल करायचा ?महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी 29 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 19 नोव्हेंबर असेल. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 544 तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी 344 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. 

अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीरकालच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अराजपत्रित गट-ब संवर्गातील मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार 22 जानेवारी 2022 ते 12 फेब्रुवारी 2022 दरम्यान गट-ब च्या मुख्य परीक्षा होणार आहेत. पीएसआय, सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्यकर निरीक्षक या पदांसाठी मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब, मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर 22 जानेवारी 2022ला होणार आहे. तर पोलिस उप निरीक्षक पेपर दोन 29 जानेवारीला, सहायक कक्ष अधिकारी पेपर दोन 5 फेब्रूवारी आणि राज्य कर निरीक्षक पेपर दोन 12 फेब्रूवारीला होणार आहे. 

 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाexamपरीक्षा