शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

माझे रिपोर्टिंग प्रफुल्ल पटेल, शरद पवारांना; महाराष्ट्राची जबाबदारी आल्यावर सुप्रिया सुळेंचे सुतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 13:42 IST

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नेमणूक करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या २४व्या वर्धापनदिनी एक मोठी घोषणा करत कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केली. यानंतर राष्ट्रवादीत घराणेशाही सुरू असल्याची टीका विरोधक करत आहेत. या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे सांगितले, होय, ही घराणेशाहीच आहे आणि मी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची मुलगी असल्याचा सार्थ अभिमान आहे. 

तसेच अजित पवार नाराज आहेत का? या प्रश्नावर बोलताना सुळे यांनी पत्रकारांची फिरकी घेत ते कोणत्या प्रश्नावर नाराज आहेत हे अधोरेखित करा अशी विचारणा केली. "केंद्रातील माझं रिपोर्टिंग शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे असेल आणि राज्यातील रिपोर्टिंग अजित पवार, जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडे असेल", असे त्यांनी नमूद केले. शिवाय कार्यकारी अध्यक्ष पदासाठी अजित पवारांनी लॉबिंग केले का? या प्रश्नावर सुळे यांनी हा पक्ष लॉबिंगने नाही तर चर्चेतून चालतो, असे म्हटले.

अजित पवारांचा रोल मोठा - सुप्रिया सुळेराष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नव्या नियुक्तीनंतर अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय चर्चा वर्तुळात आहे. याबाबत प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळेंनी म्हटले, "अजितदादांचा विरोधी पक्षनेते पदाचा रोल मोठा आहे. लोकशाहीत विरोधी पक्षनेत्याची भूमिका मुख्यमंत्र्यासारखी असते. तसेच मला कार्यकारी अध्यक्षपद मिळेल याची कल्पना देखील नव्हती."  

"सोयीप्रमाणे लोकांना पवारांची घराणेशाही दिसते"सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष बनवल्यानंतर राष्ट्रवादीत घराणेशाही सुरू असल्याची टीका विरोधक करत आहेत. याला सुप्रिया सुळेंनी पत्रकारांशी बोलताना आज प्रत्युत्तर दिले. "होय, ही घराणेशाहीच आहे. ज्या घरात माझा जन्म झाला त्याचा मला सार्थ अभिमान आहे. जे आरोप करतात त्यांच्या पक्षातील घराणेशाही मी लोकसभेत दाखवून दिली आहे. जेव्हा देशात मला एक नंबरचे रॅंकिग मिळते तेव्हा माझे वडील हे रॅंकिग देत नाहीत. शरद पवारांची मुलगी म्हणून मी संसदरत्न होत नाही. तेव्हा घराणेशाही दिसत नाही, ती फक्त सोयीप्रमाणे दिसते", अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.  

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारPraful Patelप्रफुल्ल पटेल