शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"तुम्ही केव्हा उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम"; नाव न घेता सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 15:04 IST

पुरंदमध्ये बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.

Supriya Sule : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी आणि धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखले जातात. अनेकदा अजित पवार हे पहाटेपासूनच अधिकाऱ्यांसोबत आपल्या कामांना सुरुवात करताना पाहायला मिळाले आहेत. अनेकदा कार्यक्रमस्थळी लवकर पोहोचणाऱ्या अजित पवार यांच्यामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडताना पाहायला मिळाली आहे.  अजित पवार यांनीही बहुतेकवेळा मी सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतो, असं म्हटलं आहे. मात्र आता याच विधानावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे.

पुरंदरमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. मी सकाळी लवकर उठतो, मग काय उपकार करता का? असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली. यावेळी बोलताना मला एका कोटीमध्ये शून्य किती असतात ते माहीत नाही असं म्हणत आमदार दत्तात्रय भरणे यांनाही टोला लगावला.

"इंदापूरचे आमदार दत्तामामा भरणे मतदारसंघांमध्ये ५ हजार कोटी रुपयांची विकासकामे केल्याचे सांगतात. हा आकडा म्हणजे काही विनोद नाही. मला एका कोटीमध्ये शून्य किती असतात ते माहीत नाही. सत्ता येत असते जात असते. मात्र, तुम्ही लोकांचा विचार कधी करणार? कोणी कोणावर उपकार करत नसतं. प्रत्येकजण आपापल्या परीने काम करत असतो," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

"कोणी कुणावर उपकार करत नाही. हे सांगतात आम्ही दिवसरात्र काम करतो. आम्ही तुम्हाला आग्रह केला होता का? तुम्हाला हौस आहे आमदार आणि मंत्री व्हायची. त्यामुळे काम करा. आमच्यावर उपकार करता का? ही विचार करायची पद्धत बदलली पाहिजे. कष्ट सगळेच करतात. लोकांचा डायलॉग माझ्यामुळे बंद झाला. मी सकाळी लवकर उठतो. मी म्हणाले दुधवाला पण लवकर उठतो. ४ वाजता उठता मग गावात भाषण करताना सांगता का मी लवकर उठतो. तुम्ही किती वाजता उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे माझा नाही. तिला चहा करावा लागतो. शरद पवारांनी असं कधी भाषण केले आहे का?," असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारPurandarपुरंदर