शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत श्रीकांत शिंदे?; स्वतःच सांगितली व्हायरल फोटोमागची खरी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 14:52 IST

राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते रविकांत वरपे यांनी यांनी श्रीकांत शिंदेंचा एक फोटो ट्वीट केला होता.

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनं एक फोटो ट्वीट करत मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते रविकांत वरपे यांनी यांनी श्रीकांत शिंदेंचा एक फोटो ट्वीट केला आहे. त्यात ते मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचा कारभार सांभाळतात असा आरोपही त्यांनी केलाय. आता यावर खुद्द श्रीकांत शिंदे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

“हा सर्व प्रकार हास्यास्पद आहे. हा फोटो शेअर केला जातोय आणि त्यावर बातम्याही मी पाहिल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अतिशय सक्षम मुख्यमंत्री आहेत. ते दिवसाचे १८-२० तास काम करतायत. त्यांच्या गैरहजेरीत त्यांचा कारभार सांभाळायची कोणालाही गरज नाही,” असं स्पष्टीकरण श्रीकांत शिंदे यांनी दिलं. “ज्या कार्यालयाचा फोटो व्हायरल होतोय ते आमच्या ठाण्याच्या घरातील कार्यालय आहे. जो फोटो आपण पाहिला ती खुर्ची माझी आहे. आम्ही दोघंही या कार्यालयाचा वापर करतो. ते मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासून या ठिकाणी हजोरो लोक भेटण्यासाठी येत असतात. त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम इथून होतं. हे शासकीय घर नाही. सर्व गोष्टींच्या माध्यमातून बदनाम करण्याचं जे काम होतंय, मी एकच सांगू इच्छितो आज हे जे ऑफिस आहे ते आमचं घर आहे. आम्ही वर्षानुवर्ष या ठिकाणी बसत आहोत. बोर्ड या ठिकाणी तात्पुरता ठेवण्यात आला होता. एकनाथ शिंदेंची व्हीसी होती, त्यामुळे पूर्वतयारी म्हणून ठेवला गेला होता. हा फोटो वेगळ्या अँगलनं काढला गेला. हा मुव्हेबल बोर्ड आहे. एकाच ठिकाणी बसून राज्याच्या कारभार हाकतात असे हे मुख्यमंत्री नाहीत. जिथून संधी मिळते तिथून ते काम करत असतात,” असंही ते म्हणाले.कायम्हणालेहोतेवरपे?खा. श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर?, असा सवाल वरपे यांनी फोटो ट्वीट करत केला होता.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रChief Ministerमुख्यमंत्री