शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात मंत्रालयाकडचं झाड हलवलं तर, भ्रष्ट्राचाराची शंभर प्रकरणं बाहेर पडतील; राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 11:23 IST

महाराष्ट्रात सध्याच्या मुख्यमंत्र्यांसह ४० आमदार फुटून गेलेत त्यांच्यावर काय आरोप आहेत पाहा, राऊतांचं वक्तव्य.

“देशातलं वातावरण दिवसेंदिवस आणीबाणीपेक्षाही भयानक होताना दिसतंय. राजकीय विरोधकांना निरनिराळ्या प्रकरणांमध्ये गुंतवून अटक करणे, जामीन न मिळणे यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर बेफामपणे सुरू आहे. दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड सारख्या राज्यांमध्ये हे सुरू आहे. निवडणुका जवळ येईल तसं हे वाढत जाईल. सिसोदिया हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री आहेत, शिक्षणमंत्री म्हणून जगाला हेवा वाटेल असं काम त्यांनी केलंय. त्यांनी घेतलेला निर्णय असे निर्णय हे कॅबिनेटचे आहेत. खोटे आरोप, मोठ्यानं ओरडण्यासाठी त्यांच्या यंत्रणा आहेत. लोकशाही रोज खड्ड्यात जाताना दिसतेय. केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली तेव्हाही यावर चर्चा झाली,” असं संजय राऊत म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

“केंद्राला माझं एक आव्हान आहे तुमच्या पक्षात संत आणि महात्मेच आहेत. रोज तुमची शंभर प्रकरणं बाहेर येत आहेत. महाराष्ट्रात मंत्रालयाकडचं झाड हलवलं तर भ्रष्ट्राचाराची शंभर प्रकरणं बाहेर पडतील. एलआयसीचे पैसे बुडवण्यात आले. पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक कोणी बुडवली, त्यांना साधी नोटीस पाठवली नाही. देशात आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावानं घोटाळा झाला, काय झालं? चौकशी सुरू करताच क्लिन चीट मिळाली,” असं राऊत म्हणाले. 

“२०२४ ला कोणाचं सरकार येईल हे सांगता येत नाही. ते याच पद्धतीनं तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला लागले तर तुम्हाला कोण वाचवणार. तुम्ही जो पायंडा पाडलाय तो अत्यंत घातक पायंडा आहे. या देशात असं कधी घडत नव्हतं. गेल्या सात वर्षांत आपल्या बाजूच्यांना निर्मला वॉशिंग मशीनमध्ये टाकायचं आणि स्वच्छ करून बाजूला ठेवायचं काम सुरु आहे. महाराष्ट्रात सध्याच्या मुख्यमंत्र्यांसह ४० आमदार फुटून गेलेत त्यांच्यावर काय आरोप आहेत पाहा. आशिष शेलारांनी नगरविकास खात्यासंदर्भात याचिका केलीये ती वाचा. त्या खात्यानं केलेले भ्रष्टाचार काय आहेत? ती प्रकरणं दिसत नाहीत. फक्त विरोधकांची प्रकरणं दिसतायत हे अत्यंत गंभीर आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदे