शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
3
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
4
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
5
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
6
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
7
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
8
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
9
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
10
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
11
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
12
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
13
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
14
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
15
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
16
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
17
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
18
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
19
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
20
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार

मराठा आरक्षणाच्या बैठकीचं निमंत्रण न मिळाल्यानं राऊत भडकले; भाजप आमदारानं जखमेवर मीठ चोळले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 10:52 IST

"मराठा आरक्षणावर सर्व पक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली. त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला नाही," असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला होता.

सध्या संपूर्ण राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. राज्यात ठीक-ठिकाणी तीव्र आंदोलन सुरू आहे. यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अनेक ठिकाणी तर लोकप्रतिनिधींच्या घरांना आणि कार्यालयांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. यासंदर्भात, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत, "मराठा आरक्षणावर सर्व पक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली. त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला नाही," असे म्हणत सरकारवर निशाणा साधला होता. यानंतर, आता हाच धागा धरत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांच्या जखमेवर मिठ चोळत टोमणा लगावला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत - राऊत यांनी ट्विट करत म्हटले होते, "या सरकारचे करायचे काय?महाराष्ट्र पेटलाय तरी यांचे निर्ल्लज्ज राजकरण सुरूच आहे. मराठा आरक्षणावर सर्व पक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली. त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला नाही. शिवसेनेचे 16 आमदार व 6 खासदार आहेत. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. एक आमदार असलेल्यांना आमंत्रण. एकही आमदार नाही अशांना देखील बोलावले. पण शिवसेना यांच्या डोळ्यात खुपते. अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेते म्हणून बोलावले. ठीक. आम्हाला मानपान नको. पण प्रश्न सोडवा. जरंगे पाटील यांचे प्राण वाचवा. घटनाबाह्य सरकारची घटका भरलीच आहे. हिशोबाचे वेळ जवळ येत आहे. जय महाराष्ट्र!"

भतखळ करांचा टोमणा -राऊतांच्या सरकारवरील या टीकेनंतर, भाजप नेते तथा आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना टोमणा लगावला आहे. "फडणवीस सरकारने दिलेले मराठा आरक्षण ज्यांच्यामुळे गेले त्यांना मराठा आरक्षणाच्या बैठकीला कशासाठी बोलवायचे? असा तर्कसंगत विचार शिंदे फडणवीस सरकारने केला असावा..." असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

काय करायचे ते करा, पण...; जरांगेंचा अल्टिमेटम -काल मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांसंदर्भात बोलताना जरांगे यांनी म्हटले होते की, "शासनाने घेतलेला एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्यावे. शासनाने काय करायचे ते करावे. बुधवारी रात्रीपर्यंत मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आज रात्रीपासून पाणी पिणे बंद करणार असून, होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार असेल."

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAtul Bhatkalkarअतुल भातखळकर