शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

...तर विकासाची व्याख्या बदलावी; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा, फडणवीसांवरही बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 12:58 IST

भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन भ्रष्टाचार संपवा असं धोरण आहे. भ्रष्टाचाराविरोधात मोदींनी युद्ध पुकारले होते. याच लोकांना वॉशिंग मशिनमध्ये टाकून मोदींनी स्वच्छ केले असं राऊतांनी म्हटलं.

मुंबई - Sanjay Raut on BJP ( Marathi News ) सरकारमध्ये गँगवॉर आहे. ज्याने मुंबईचं अंडरवर्ल्ड पाहिलंय त्यांना माहिती आहे. गँगमध्येही गँगवॉर असायचे. शिंदे गटातही तेच गँगवॉर सुरू आहे. विधानसभेत मंत्री आणि आमदार एकमेकांना मारतात, धक्काबुक्की करतात हाच तुमचा विकास आहे. तर विकासाची व्याख्या बदलावी लागेल. महाराष्ट्रात विकासाचा गँगवॉर सुरू आहे ही तुमची व्याख्या असेल तर तुमच्या शब्दकोशातून विकासाची व्याख्या बदला असं पत्र मी आरएसएसला लिहिणार आहे अशा शब्दात खासदार संजय राऊतांनीभाजपासहदेवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. 

संजय राऊत म्हणाले की, गेल्या १० वर्षापासून भाजपाचं सरकार आहे, त्यांनी केलेल्या कामाबद्दल देवेंद्र फडणवीस सांगू शकतात का?. ७० वर्ष जो विकास झालाय तो नरसिंह राव ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत झाला. मोदी-शाह यांच्या सरकारने काय विकास केलाय हे तुम्ही सांगावे. फक्त पैशाच्या ताकदीवर, तपास यंत्रणेचा वापर करून आमदार खरेदी करणे आणि विरोधकांची सरकारे पाडणे हाच तुमचा विकास आणि धोरण असेल तर नक्की हे तुम्हीच केलंय. ७० हजार कोटी घोटाळा, आदर्श घोटाळा आणि भ्रष्टाचाराबद्दल मोदीजी बोलतात, पण त्याच भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन ते देश चालवतात हाच विकास आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच तुमचं सरकार हे विरोधकांवर खोटे आरोप करून गुन्हे दाखल करतात आणि त्यांच्यावर दबाव आणतात. उद्या आदर्श घोटाळा झालाच नव्हता असं भाजपा म्हणले. हाच विकास आहे. भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन भ्रष्टाचार संपवा असं धोरण आहे. भ्रष्टाचाराविरोधात मोदींनी युद्ध पुकारले होते. याच लोकांना वॉशिंग मशिनमध्ये टाकून मोदींनी स्वच्छ केले. जर शेतकऱ्यांना नुकसान  भरपाई मिळत नाही, मालाला भाव मिळत नाही. शेतकरी आत्महत्या करतायेत. दिल्लीत येण्याचा प्रयत्न करताय त्यांना रोखलं जाते. नितीन गडकरी अनुभवी नेते आणि स्पष्टवक्ते, ते खोटे बोलत नाही. त्यामुळे गडकरी जे बोलतायेत आणि जे बोललेत त्यात काही फरक नाही. उघडपणे शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातंय. शेतकऱ्यांच्या मागण्या चुकीच्या नाहीत असं राऊतांनी म्हटलं. 

दरम्यान, महाविकास आघाडीची बैठक होईल, प्रकाश आंबेडकरही सहभागी होतील. आंबेडकरांसोबत महाविकास आघाडी पुढे जाईल. इतकं पुढे जाईल की देशाच्या परिवर्तनात प्रकाश आंबेडकरांचे मोठे योगदान असेल. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. ते लोकशाही, संविधानाचे प्रमुख चौकीदार आहेत. पुन्हा मोदी-शाह यांचे राज्य आले तर कष्टकरी सामान्य माणसाच्या घरावरही धाडी पडतील असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय ते खरेच आहे असंही संजय राऊत बोलले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस