शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंची खेडची सभा अतिविराट होईल, दुसऱ्या सभेचं ठिकाणही संजय राऊतांनी सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 10:58 IST

ज्यांना जायचं ते निघून गेले, आता उरलेत ते निष्ठावंत आहेत असं खासदार संजय राऊतांनी सांगितले.

मुंबई - उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष घातलंय. तालुकापातळीवर शिवगर्जना सभा झाल्या, रोड शो झाले. लोकांचा प्रचंड सहभाग होता. आजची खेडची सभा ज्यासभेला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. कोकणातील अतिविराट ही सभा असेल. कोकण हा कायम शिवसेनेचा गड, पाठिराखा राहिलाय. शिवसेनेच्या संघर्षात कोकणाचं योगदान मोठे राहिले आहे. कोकणाने नेहमी बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर श्रद्धा ठेवलीय. खेडसारख्या सभा राज्यातील अनेक भागात होतील. उद्धव ठाकरे राज्यभरात फिरतील. खेडनंतर दुसरी सभा मालेगावला होईल त्याची तयारी सुरू आहे अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, ज्यांना जायचं ते निघून गेले, आता उरलेत ते निष्ठावंत आहेत. शिवसेना आजही त्याच ताकदीने उभी आहे. कागदावर नाव, चिन्ह मिळाले परंतु शिवसेनेची जनता मिळाली नाही. जनता सुपूर्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. अनेक कार्यकर्ते, नेते शिवसेनेत प्रवेश करतायेत हे सत्य आहे. संजय कदम हे मूळचे शिवसैनिकच आहेत. खेड आणि आसपासच्या जागा जिंकण्यासाठी या कार्यकर्त्यांचा फायदा होणार आहे असं त्यांनी सांगितले. 

काश्मिरी पंडिताच्या हत्येचा वापर राजकीय फायद्यासाठी संजय शर्मा या काश्मिरी पंडिताची पुलवामाच्या बाजारात हत्या झाली. सरकारी कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांना मारले जाते. शेकडो पंडीत आजही आक्रोशाने जम्मूत रस्त्यावर बसले आहेत. पंजाबमध्ये काही ठिकाणी खलिस्तानी भूत उभे राहताना दिसते. ही जबाबदारी केवळ राज्य सरकारवर नाही तर सीमावर्ती भाग आहे. त्यामुळे केंद्राची जबाबदारी तितकीच आहे. भाजपानं संवेदनशीलतेचा राजकारणासाठी उपयोग केला. काश्मिरी पंडित मेल्यानंतर त्याचा राजकीय वापर भाजपा करते. हे कितीवेळ चालणार? असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. 

भाजपा-शिंदेच्या आशीर्वाद यात्रेवर टीकाभाजपानं अशा यात्रा काढून काही उपयोग नाही. आमच्या शिवगर्जना यात्रेला महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळाला म्हणून ते मूळापासून हादरले आहे. शिवसेनेच्या जनमताचा पाठिंबा हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे. पैसाच्या जोरावर भाजपा-शिंदे गट यात्रा काढणार आहे. तुम्ही या यात्रा काढा ज्यामुळे तुमची बेईमानी आणि गद्दारी लोकांसमोर पोहचेल असं सांगत संजय राऊतांनी भाजपाच्या आशीर्वाद यात्रेवर टीका केली आहे. ...म्हणून विरोधकांनी पत्र लिहिलंपंतप्रधान नरेंद्र मोदी घटनात्मक पदावर बसलेत. त्यामुळे ९ विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी सीबीआय, ईडीच्या तपास यंत्रणेचा गैरवापर होतोय यासाठी पत्र पाठवले आहे. मोदींच्या संमतीने हे घडतेय हे खरे असले तरी विरोधी पक्ष गप्प बसला नाही हे जनतेला माहिती पडावं म्हणून विरोधकांनी पत्र पाठवले आहे असं राऊतांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे