शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Maharashtra: विधानसभा अधिवेशनानंतर सहा मंत्र्यांसह खासदार, आमदार कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 07:00 IST

मोठ्या प्रमाणावर मंत्री आणि लोकप्रतिनिधी कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने बुधवारी होणारी राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक रद्द करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. सहा ज्येष्ठ मंत्र्यांसह खासदार आणि आमदार मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित झाले आहेत.

मोठ्या प्रमाणावर मंत्री आणि लोकप्रतिनिधी कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने बुधवारी होणारी राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक रद्द करण्यात आली आहे. दर बुधवारी किंवा गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक होते. कोरोनाची साथ आल्यापासून मंत्रिमंडळ बैठकीचे ठिकाण मंत्रालयाऐवजी सह्याद्री अतिथिगृह करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकांना ऑनलाइन पद्धतीने उपस्थिती लावत असत. या आठवड्याची मंत्रिमंडळ बैठक आज, बुधवारी आयोजित करण्याचे नियोजन होते, मात्र मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आल्याचा निरोप दुपारीच मंत्र्यांच्या खासगी सचिवांना देण्यात आला.

मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी बहुतांश आमदार आणि राजकीय कार्यकर्ते आपली कामे घेऊन मंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात येत असतात. आपली कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे खबरदारी म्हणून मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदींना करोना संसर्ग झाला आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, राजन विचारे आमदारांमध्ये भाजपचे सागर मेघे, राधाकृष्ण विखे पाटील, शेखर निकम, इंद्रनील नाईक, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, रोहित पवार, प्रताप सरनाईक आदी आमदारांना कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान   राज्य मंत्रिमंडळातील १३ मंत्री, तर राज्यभरातील तब्बल ७० आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

डॉ. तात्याराव लहाने पाॅझिटिव्हज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून, उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. लहाने यांनी दिली. त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

संपर्कात आलेल्यांना आवाहनएकनाथ शिंदे यांनी आपली प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले. आपल्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची चाचणी करून घ्यावी व उपचार करावे, असा सल्ला त्यांनी दिला. आपली प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची चाचणी करून घ्यावी व उपचार करावे, असा सल्ला त्यांनी दिला. शिंदे यांनी सोमवारी विद्यार्थ्यांच्या लसीकरण कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस